Solar Pump : सोलर पंपाचे पैसे परत मिळणार आहेत. परंतु यासाठी काही अटी आहेत.

आपण मुख्यमंत्री किंवा कुसुम सोलर योजनेतून सौर पंप बसविला असेल तर संपूर्ण माहिती वाचा.

शेतकऱ्यांना ९०% ते ९५% अनुदानावर सोलर पंप योजनेमार्फत दिले जातात.

कोणाला मिळणार भरलेले पैसे परत?

SC आणि ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना सोलरपंपसाठी भरलेले पैसे परत मिळणार आहेत.

त्यासाठी SC/ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना MAHA DBT पोर्टल वरती अर्ज करावा लागणार आहे.

पोर्टल : https://mahadbtmahait.gov.in/Farmer/

त्यामध्ये त्यांची निवड झाल्यास एसएमएस द्वारे कळविण्यात येईल.

आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाईन पोर्टल वरती अपलोड करावी. वेरीफीकेशन झाल्यांनतर आपण पात्र-अपात्र ठरेल. नंतरच पुढील प्रोसेस केली जाईल.