ग्रामपंचायत घरकुल योजना यादी 2024, येथून पहा; Gharkul List
Gharkul List : ग्रामपंचायत मार्फत विविध शासकीय योजना राबविल्या जातात, घरकुल योजना-प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, इंदिरा आवास “Gharkul List” योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना इ. अशा विविध योजना राबविल्या जातात. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लाभार्थींना गाई-गोठा, फळबाग लागवड, शौचालय, नवीन विहीर बांधकाम, विहीर दुरुस्ती इ. लाभार्थींना योजनेचा लाभ दिला जातो. या लेखामध्ये आम्ही ग्रामपंचायत घरकुल योजनेची यादी-लिस्ट आपण मोबाईल वरती कशी पहायची याची संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे.
Gram Panchayat Gharkul List
ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड लागते. आपल्याकडे जर हे जॉब कार्ड असेल तर ग्रामपंचायत योजनांचा लाभ घेण्यास मदत होऊ शकते. ग्रामपंचायत घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी येथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे, खालील स्टेप फॉलो करून आपण आपल्या ग्रामपंचायत घरकुल योजनेची यादी पाहू शकता.
Maharashtra Gharkul Yojana List
मोबाईल मध्ये घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी आपण वेबसाईट वरून यादी कशी पहायची सविस्तर वाचा.
Gharkul Yojana Website (वेबसाईट वरून यादी पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा)
- मोबाईल ब्रावजर मध्ये https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx हि लिंक ओपन करावी त्यानंतर खालील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तीन रेषा (मेन्यू) वरती क्लिक करा.
- त्यानंतर Awaassoft या ऑप्शन समोरील बाणावर क्लिक करा. त्यानंतर दुसरा मेन्यू ओपन होईल, त्यामध्ये Report ऑप्शन वरती क्लिक करावे.
- Report या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा खालीलप्रमाणे नवीन पेज ओपन होईल.
- वरील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आवास योजनांची नावे पाहायला मिळतील. प्रधानमंत्री आवास योजनेची यादी पहायची असेल तर PMAY-G Report या बटन ऑप्शन वरती क्लिक करा.
- इंदिरा आवास योजनेची यादी पहायची असेल तर IAY-Indira Awaas Yojana Report या ऑप्शन वरती क्लिक करा.
- यादी पाहण्यासाठी 2.Household Progress against the target financial year या ऑप्शनवर क्लिक करावे. पुन्हा एक नवीन पेज खालीलप्रमाणे ओपन होईल.
- योजनेनुसार आर्थिक वर्ष निवडण्यासाठी पर्याय येईल, त्यामधून तुम्हाला ज्या वर्षाची यादी पहायची आहे ते वर्ष निवडा.
- सर्वप्रथम आपले राज्य निवडा त्यानंतर आपला जिल्हा नंतर आपले गाव निवडा. The Answer is : खालील चौकोनात Type Captcha वरील अंकाची बेरीज/वजाबाकी संख्या भरा.
- Submit ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची घरकुल यादी पाहायला मिळेल.