सोलर पंप योजना नवीन अपडेट आत्ताच हे काम करा : Saur Krushi Pump Yojana Maharashtra
Saur Krushi Pump Yojana Maharashtra : सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी योजना आहे. शेतकऱ्यांना योजनेमधून सौर कृषी पंप दिला जातो. ज्या शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज केलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, अन्यथा सोलर पंप मिळणार येऊ शकते अडचण वाचा सविस्तर माहिती.
Saur Krushi Pump Yojana Maharashtra
शेतकऱ्यांसाठी शासनाने प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजने अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरु केले होते. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत, तसेच निवड प्रक्रिया सुरु झालेली आहे, ज्या शेतकऱ्यांची योजनेमध्ये निवड झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना मोबाईल एसएमएस येत आहेत. निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना सेल्फ सर्व्हे करावा लागतो. त्यानंतर सौर पंप स्थापित केला जातो.
Kusum Solar Pump New Update
ज्या शेतकऱ्यांनी पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज भरलेले आहेत, यामधील काही शेतकऱ्यांना महावितरण कडून एसएमएस येत आहेत, तसेच आपल्या अर्जामधील कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यास कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्यास पर्याय दिला जात आहे, उदा. ७/१२ वरती जर विहीर, बोरवेल, शेततळे इ. नोंद नसल्यास शेतकऱ्याला खालीलप्रमाणे एसएमएस येत आहे.
ज्या शेतकऱ्यांना वरीलप्रमाणे एसएमएस आला असेल अशा शेतकऱ्यांनी ७/१२ वरती पाण्याच्या स्त्रोताची (अर्ज भरताना निवलेला स्त्रोत, उदा. विहीर, बोरवेल, शेततळे) नोंद लावून सहीचा ७/१२ पोर्टल वरती अपलोड करावा.
तसेच ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र सामाईक किंवा विहीर, बोरवेल, शेततळे इ. सामाईक आहे, अशा शेतकऱ्यांच्या संमतीपत्रामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास त्यांना देखील पुन्हा संमती पत्र अपलोड करण्यासाठी एसएमएस येत आहेत. शेतकऱ्याने अर्जामधील माहितीची कागदपत्राची पूर्तता न केल्यास त्या शेतकऱ्याचा अर्ज नाकारला जाईल, यामुळे सोलर पंपाचा लाभ मिळणार नाही.