Kusum Solar Pump Yojana; या शेतकऱ्यांना मिळणार नाही सोलर पंप
Kusum Solar Pump Yojana : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आता प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना अंतर्गत काही शेतकऱ्यांना मिळणार नाही सौर पंप, काय आहे प्रकरण? पहा सविस्तर माहिती.
Kusum Solar Pump Yojana
मागील वर्षापासून शेतकऱ्यांसाठी सौर पंप करिता प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजना kusum yojana अंतर्गत अर्ज भरणे सुरु झाले होते. त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी ३ एचपी, ५ एचपी आणि ७.५ एचपी क्षमतेच्या पंपाकरिता ऑनलाईन फॉर्म भरले होते.
योजनेमधून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पंप बसविण्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांचे पंप बसविणे अजून बाकी आहेत. लवकरच सर्व शेतकऱ्यांचे सौर पंप बसविले जाणार आहेत.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ?
ज्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना व अटल कृषी पंप योजना -१ व २ अंतर्गत योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेमधून लाभ घेता येणार नाही. यामुळे अशा शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेकरिता अर्ज करू नयेत.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना व अटल कृषी पंप योजना -१ व २ योजनेमध्ये लाभ घेऊन सुद्धा कुसुम घटक-ब योजनेकरिता अर्ज केल्यास अर्ज रद्द केला जाणार आहे. त्यामुळे महा कृषी अभियान प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेमध्ये एका शेतकऱ्याने एकाच सौर पंप करिता अर्ज सादर करावा.एकापेक्षा अधिक पंपाकरिता अर्ज भरल्यास इतर अर्ज/फॉर्म रद्द केले जाणार आहेत.
महाराष्ट्र उर्जा अभियान-प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना
काही शेतकरी उपरोक्त योजनेअंतर्गत लाभ घेऊनसुद्धा प्रधानमंत्री कुसुम घटक-ब (kusum solar yojana) योजनेतून लाभ घेण्यासाठी पूर्वीचा पंप काढून ठेवून लाभ न घेतल्याचे भासवतात व पीएम कुसुम घटक-ब योजनेमधून सौर पंप आस्थापित करून घेत आहेत. असे निदर्शनास आल्यास सौर पंप काढून घेतला जाईल व लाभार्थी हिस्सा भरलेली रक्कम जप्त केली जाईल.
खालील सूचना वाचण्यासाठी फोटो वरती काही सेकंद क्लिक करा नंतर तुम्हाला Save Image पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा, मोबाईल मध्ये फोटो सेव्ह होईल. आपण संपूर्ण माहिती वाचू शकता.{kusum solar pump yojana}
अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या : https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
मला कॄषी सौरऊर्जा मिळेना काय करावे लागेल ,
कश्यामुळे मिळत नाही.
अर्ज मोबाईलवरून करता येईल का करता येत असल्यास वेबसाईट पाठवा
सर, नवीन सौर ऊर्जेचे फॉर्म केव्हा चालु होणार आहेत