सोलर पंप योजनेचा अर्ज केला असेल तर, आता हे काम करा : Kusum Solar Pump Yojana Maharashtra

Solar Pump Kusum Yojana

Solar Pump Kusum Yojana : प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेचे फॉर्म सुरु आहेत, तसेच अर्ज सुरु झाल्यापासून अनेक शेतकऱ्यांनी (Solar Pump Kusum Yojana) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. अर्ज भरताना काही शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये चुका झालेल्या आहेत.

या लेखामध्ये काय आहे.

Kusum Solar Pump Yojana Maharashtra

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेतून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप ९०% ते ९५% अनुदानावरती दिला जातो. शेतकऱ्यांना फक्त उर्वरित ५% ते १०% रक्कम भरावी लागते. योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरु आहेत. ज्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरावा.

अर्ज भरताना काही शेतकऱ्यांची कागदपत्रे अपलोड झालेली नाहीत, तर काही शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये फॉर्म भरताना बँक खाते नंबर, आयएफएससी कोड, पंपाची माहिती चुकीची भरली गेली आहे. सर्व शेतकऱ्यांची अर्जाची छाननी/तपासणी सुरु झालेली आहे, ज्या शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास त्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे कळविले जात आहे.

महत्वाचे : प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांच्या अर्जाची व सोबत जोडलेल्या कागदपत्राची तपासणी सुरु झालेली आहे. तसेच निवड प्रक्रिया सुरु झाली आहे, आपल्या अर्जामधील कागदपत्रामध्ये काही त्रुटी असल्यास शेतकऱ्याला तसा एसएमएस येईल. एसएमएस मिळाल्यानंतर शेतकऱ्याने दिलेल्या कालावधीमध्ये कागदपत्राची पूर्तता/ अर्जाची दुरुस्ती करून अर्ज सादर/सबमिट करावा.

www.mahaurja.com kusum registration

काही शेतकऱ्यांचे अर्जामध्ये कागदपत्रे अपलोड झालेली नाहीत, तर काही शेतकऱ्यांनी सामाईक क्षेत्र असल्यास त्याचे संमतीपत्र/ना हरकत प्रमाणपत्र सादर केलेले नाही. (kusum mahaurja com solar beneficiary register) योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याने अचूक अर्ज भरणे व संबंधित कागदपत्रे विहित कालावधीमध्ये जमा अपलोड करणे गरजेचे आहे.

Similar Posts

3 Comments

  1. SMS ala nahi parantu , aamhi login id and password takun , kahi correction ahe ka te bghu shakto ka ?

  2. सोलर पंपासाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *