ई पिक पाहणी झाली का? असे चेक करा मोबाईलवर : e pik pahani status

e pik pahani status

E Pik Pahani Status : शेतकरी मित्रांसाठी महत्वाची माहिती, अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा साठी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. परंतु पिक विमा “E Pik Pahani Status” योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्याने ७/१२ वरती पिकाची नोंद करणे गरजेचे आहे.

या लेखामध्ये काय आहे.

E Pik Pahani Status

शेतकऱ्याने प्रत्येक हंगामात आपल्या शेतातील पिकाची नोंद हि ७/१२ वरती करणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्याला पिकाची नुकसान भरपाई व इतर योजनेचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही. शेतकऱ्याने जर ७/१२ वरती आपल्या शेतातील पिकाची नोंद केली नाही तर त्याला शासकीय योजनेचा लाभ व पिक विमा, पिक नुकसान भरपाई मिळण्यास अडचण येऊ शकते.

जसे कि मागील काही महिन्यांपूर्वी शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३०० रु अनुदान देण्याची घोषणा केली होती, परंतु याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या ७/१२ वरती कांदा पिकाची नोंद असणे गरजेचे होते. यामुळे काही शेतकऱ्यांनी प्रत्येक हंगामात आपल्या पिकाची नोंद ७/१२ वरती करणे म्हणजेच पिक पाहणी करणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

E pik pahani online

शासनाने शेतकऱ्यांना पिक पाहणी करण्यासाठी ई पिक पाहणी (E Pik Pahani) हे App उपलब्ध करून दिले आहे. शेतकरी ई पिक पाहणी अँप मधून शेतातील पिकाची नोंद त्याचबरोबर , कायम पड क्षेत्राची नोंद, चालू पड नोंद, विहीर, बोअरवेल, शेततळे, तलाव इ. नोंद करता येते.

शेतकऱ्याने पिक पाहणी केल्यानंतर पिक पाहणी झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

e pik pahani status check online

  • ई-पिक पाहणी झाली आहे का हे पाहण्यासाठी आपण सर्वप्रथम पिक पाहणी हि नवीन अँपमधून केली आहे का? हे चेक करावे यासाठी मोबाईल मधील प्ले-स्टोर ओपन करून e pik pahani अँप अपडेट केले आहे का हे चेक करा.
  • त्यानंतर अँप ओपन करून आपले नाव निवडा व सांकेतांक टाकून लॉग इन करावे.
  • खालील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे गावाचे खातेदाराची पिक पाहणी हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.
e pik pahani status check online
e pik pahani status check online
  • आपल्या गावातील खातेदाराची यादी तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या शेतकऱ्यांनी पिक पाहणी केली आहे अशा शेतकऱ्याचे हिरव्या रंगात हायलाईट केले आहे.
E pik pahani online
  • नावासमोरील 👁 चिन्हावर क्लिक करा. त्याठिकाणी पिक पाहणी केलेली माहिती पाहायला मिळेल. अशा प्रकारे आपण आपली पिक पाहणी झाली आहे का चेक करू शकता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *