जमिनीची मोजणी अशी करा मोबाईवरून; Land Measurement Online

Land Measurement Online

Land Measurement Online : अनेक ठिकाणी शेतजमिनीच्या बांधावरून वाद निर्माण अशा वेळेस जमीन मोजणी करण्यासाठी अर्ज करावा लागतो. परंतु आपण मोबाईलच्या माध्यमातून काही मिनिटामध्ये जमिनीची मोजणी “Land Measurement Online” करू शकता. मोबाईलवरून केलेली मोजणी हि १००% अचूक असेल असे नाही. यामध्ये बदल होऊ शकतो.

Land Measurement Online (शेत जमीन मोजणी कशी करावी)

मोबाईल वरून मोजणी करून आपल्याला अंदाज येईल कि आपले क्षेत्र कमी आहे कि जास्त. हि मोजणी आपण गुगल च्या मदतीने करणार आहोत. म्हणजेच आपल्याला मोबाईलमध्ये Google Earth हे A+pp घ्यावे लागेल.

मोबाईल वरून जमिनीची मोजणी कशी करावी? (Jamin Mojani Kashi Karaychi)

  • मोजणी करण्यासाठी आपण मोबाईमध्ये प्ले स्टोर वरून Google Earth हे A+pp घ्यावे.
Land Measurement Online
  • त्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचे आहे. आणि मोबाईल मधील Location सुरु करा. खाली बाण दाखवलेल्या माणसाच्या चिन्हाच्या वरील गोल वर क्लिक करा. म्हणजे तुम्ही ज्याठिकाणी आहात त्याठिकाणाचा नकाशा ओपन होईल.
Land Measurement Online
Land Measurement Online
  • तुम्हाला ज्या प्लॉटची/ शेतजमिनीची मोजणी “मोबाईलवर जमीन कशी मोजावी” करायची आहे. त्या प्लॉटचा नकाशा ओपन करा.(आपण त्या प्लॉटच्या ठिकाणी उभे असाल तर अजून सोपे होईल.)
  • वरच्या फोटो मध्ये दाखवेलेल्या २ नंबरच्या पर्यायावर क्लिक करा.
  • खाली दाखवल्याप्रमाणे close point च्या जागेवर तुम्हाला Add Point ऑप्शन दिसेल तुम्हाला ज्या प्लॉट ची मोजणी करायची आहे. प्लॉटच्या बांधावर गोल पाँईट ठेवा आणि Add Point वर क्लिक करा.
  • नंतर प्लॉटचा दुसरा कोपरा त्यावर गोल पाँईट घेऊन जा व पुन्हा Add Point वर क्लिक करा.
  • असेच प्लॉटच्या बाजूने पूर्ण Add Point करा व पहिल्या पाँईट ला शेवटचा पाँईट जोडा.
  • तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे Add Point च्या जागेवर Close Point पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
Land Measurement Online
  • डाव्या बाजूला प्लॉटचे क्षेत्र मीटर मध्ये दाखवले जाईल, त्याच्या खाली तुम्हाला Area हा पर्याय दिसेल.
  • त्यामध्ये तुम्हाला Ac पर्याय निवडा म्हणजे आपले क्षेत्र किती एकर आहे. हे तुम्हाला पाहायला मिळेल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *