अखेर 2 हजार रुपये हप्ता मिळण्यास सुरुवात : Namo Shetkari Yojana 1 installment

Namo Shetkari Yojana 1 installment

Namo Shetkari Yojana 1 installment : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, अखेर राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कोणाला मिळणार योजनेचा लाभ? अर्ज कुठे करावा? इ. माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

या लेखामध्ये काय आहे.

Namo Shetkari Yojana 1 installment

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ६००० रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र राज्यातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थींना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत ६००० रु. व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत ६००० रु. असे एकूण १२ हजार रुपये दरवर्षी मिळणार आहेत.

शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. जर तुम्हाला पीएम किसान योजनेचे २ हजार रुपये मिळत असतील तर तुम्हाला नवीन अर्ज भरण्याची गरज नाही. शेतकरी https://pmkisan.gov.in/ पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर आपण काही दिवस वाट पहावी. तसेच पीएम किसान योजनेचा मागील हप्ता ज्या बँक खात्यात जमा झाला आहे त्या बँक खात्यात “Namo Shetkari Yojana” २ हजार रुपये जमा झाले आहेत का? हे चेक करावे.

Similar Posts

Leave a Reply