Samuhik Shet tale Yojana; सामूहिक शेततळे योजना ऑनलाईन अर्ज सुरु

Samuhik Shettale Yojana

Samuhik Shettale Yojana : सामूहिक शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. शेतकऱ्यांना सामुदायिक शेततळे योजना “Samuhik Shet tale Yojana” करिता ऑनलाईन अर्ज करावा लागेल. योजनेबद्दल सविस्तर माहिती यालेखामध्ये दिलेली आहे.

Samuhik Shettale Anudan Yojana

सामुहिक शेततळे हे शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना अंतर्गत लाभ दिला जातो. सामुहिक शेततळे योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करताना शेतकरी गट नोंदणी करावी लागते. सामुहिक शेततळे योजनेसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी-MahaDBT पोर्टल वरती अर्ज करावा लागतो. मागील काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांना योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागत असे.

परंतु आता शेतकऱ्यांना शेती संबधित कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास महाडीबीटी शेतकरी पोर्टल वरती अर्ज करावा लागतो. हि सुविधा पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जाण्याची गरज पडत नाही.

योजनेचा घटकसामुहिक शेततळे
लाभार्थी वर्गशेतकरी
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज कुठे करावाMahaDBT अर्ज करा
Magel tyala shettale yojana

Samuhik Shettale Yojana – सामुहिक शेततळे अनुदान योजना 2024

सामुहिक शेततळे या घटकासाठी शेतकऱ्यांना अर्ज भरताना महाडीबीटी पोर्टल वरती शेतकरी गट म्हणून नोंदणी करावी लागेल. तसेच त्या शेतकऱ्याकडे फुले, फळे, भाजीपाला, मसाला पिके इ. पिके असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (samuhik shet tale yojana documents)

  • राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तकाची झेरॉक्स
  • आधार कार्ड झेरॉक्स
  • ७/१२, ८ अ उतारा
  • लाभार्थी अनु.जाती, अनु.जमाती प्रवागातील असल्यास जात प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • हमीपत्र

सामुहिक शेततळ्याकरिता अनुदान किती मिळणार

  • ३४*३४*४.७० आकारमान असल्यास ३ लाख ३९ हजार पर्यंत अनुदान मिळू शकते.
  • २४*२४*४ आकारमान असल्यास १ लाख ७५ हजार रुपये पर्यंत अनुदान मिळू शकते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *