पिक विमा संमती पत्र डाऊनलोड | Pik Vima Sammati Patra
Pik Vima Sammati Patra in Marathi : शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल बिमा (pmfby) योजने अंतर्गत पिक विमा अर्ज भरणे सुरु झालेले आहेत. शेतकऱ्यांना ऑनलाईन पिक विमा काढता येणार आहे. यालेखामध्ये आम्ही पिक विमा योजनेसाठी लागणारे सामाईक क्षेत्र संमतीपत्र दिलेले आहेत.
Pik Vima Sammati Patra in Marathi
पिक विमा भरताना काही शेतकऱ्यांचे क्षेत्र सामाईक असल्यामुळे त्यांना पिक विमा अर्ज भरताना सोबत इतर खातेदारांचे संमती पत्र घ्यावे लागते. अनेक शेतकऱ्यांना नक्की कोणते संमतीपत्र द्यायचे हे माहित नसल्यामुळे फॉर्म भरण्यास अडचण येते. फॉर्म भरताना शेतकऱ्याचे क्षेत्र जर सामाईक क्षेत्र “pik vima samati patra in marathi” असेल तर त्या शेतकऱ्यांना ७/१२ मधील इतर खातेदाराचे संमती पत्र घेऊन फॉर्म भरावा.
प्रधानमंत्री फसल बिमा योजना अर्ज भरण्यासाठी आपल्याकडे पिक पेरा स्वयंघोषणापत्र असणे गरजेचे आहे. तसेच सामाईक क्षेत्र असल्यास संमती पत्र देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना सुरु झाली असून शेतकऱ्यांना १ रुपयांमध्ये पिक विमा भरता येणार आहे. शेतकरी मोबाईल वरून किंवा जवळील आपले सरकार सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र याठिकाणी जावून पिक विमा भरू शकतात.
पिक विमा फॉर्म भरण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- ७/१२, ८ अ उतारा
- मोबाईल नंबर
- पिकपेरा स्वयं घोषणा पत्र
- क्षेत्र सामाईक असल्यास संमती पत्र