शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज : Mukhyamantri baliraja mofat vij yojana
Mukhyamantri baliraja mofat vij yojana : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी साठी मोफत वीज मिळणार आहे. राज्यात मार्च २०२४ अखेर पर्यंत ४७.४१ लाख कृषी पंप ग्राहक आहेत. या ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत राज्यात वीज पुरवठा केला जातो. एकूण ग्राहकांपैकी १६% ग्राहक हे कृषी पंप ग्राहक (शेतकरी) असून उर्जेच्या वापराच्या पैकी ३०% उर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजना चा लाभ याबद्दल सविस्तर माहिती आम्ही दिलेली आहे.
Mukhyamantri baliraja mofat vij yojana
जागतिक हवामान बदलामुळे तसेच अनियमित होणाऱ्या पावसामुळे शेती व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठी नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीचा हात देणे आवश्यक आहे. सदर परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने राज्यातील ७.५ HP पर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंपा करिता मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे.(माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करा)
भारतातील शेती हि मुख्यता पावसावर अवलंबून आहे, दिवसेंदिवस हवामानामध्ये बदल होत आहेत, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजनेतून ७.५ एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. सदर योजना ५ वर्षासाठी असणार आहे म्हणजेच एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत हि योजना राबविली जाणार आहे परंतु ३ वर्षाचा योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधी बाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजना 2024
एप्रिल २०२४ पासून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजना राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी हि महत्वाची अशी योजना ठरणार आहे. योजनेमधून ७.५ एच पी कृषी पंप पर्यंतच्या शेतकऱ्यांना ५ वर्षाकरिता एप्रिल २०२४ पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजना-२०२४ सुरु केली आहे.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज बिल योजना |
लाभार्थी वर्ग | शेतकरी |
विस्तार | महाराष्ट्र राज्य |
शासन निर्णय (जीआर) | पहा |