बँक ऑफ महाराष्ट्र खातेदारांसाठी अत्यंत महत्वाची माहिती

bank of maharashtra new update

Bank Of Maharashtra News Update : या डिजिटल युगात बऱ्याच गोष्टी ह्या डिजिटल होत आहेत. बँकिंग क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्वच व्यवहार हे ऑनलाईन होत आहेत. यामुळे नागरिकांची बँक मध्ये होणारी गर्दी नक्कीच कमी झाली आहे.

Bank Of Maharashtra News Update

बँक ऑफ महाराष्ट्रने खातेदारांना मिस्ड कॉल सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे खातेदारांना बँक खात्यातील शिल्लक तपासणे, स्टेटमेंट, ई-मेल स्टेटमेंट सेवा घरबसल्या मिळणार आहे. यासाठी खातेदारांना बँक ऑफ महाराष्ट्र च्या मिस्ड कॉल नंबर वरती कॉल करायचा आहे.

काही मिनिटातच तुम्हाला बँकेकडून एसएमएस (SMS) येईल. आणि आपण निवडलेल्या सेवेची माहिती मिळेल. हि सेवा बँक ऑफ महाराष्ट्राच्या सर्व खातेदारांसाठी उपलब्ध आहे

बँक ऑफ महाराष्ट्रकडून खालील मिस्ड कॉल सेवा उपलब्ध आहेत.

  • आपल्याला जर बँक खात्यातील शिल्लक पहायची असेल तर ९२२२२८१८१८ या नंबर वरती मिस्ड कॉल द्या. कॉल केल्यानंतर काही सेकंदात कॉल ऑटो डिस्कनेक्ट होईल आणि तुम्हाला काही मिनिटातच बँकेकडून एसएमएस (SMS) येईल.
  • शेवटचे पाच आर्थिक व्यवहार (Last 5 Transactions) पहायचे असतील तर ७२८७८८८८८६ या नंबर वरती कॉल करा.
  • मागील ३० दिवसांचे स्टेटमेंट ई-मेल वरती हवे असल्यास ७२८७८८८८८७ या नंबर वरती कॉल करा. रजिस्टर ई-मेल वरती स्टेटमेंट पाठविले जाईल.

टीप : वरील सेवेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बँक खात्याशी मोबाईल नंबर लिंक असावा. लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरूनच आपल्याला कॉल करावा लागेल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *