शेततळे अस्तरीकरण योजना ऑनलाईन अर्ज सुरु; Shet tale Astarikaran Yojana

Shet tale Astarikaran Yojana

शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी (Shet tale Astarikaran Yojana) ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. शेतकऱ्यांना योजनेतून शेततळे अस्तरीकरण/ म्हणजेच शेततळे कागदासाठी अनुदान दिले जाते, शेततळे अस्तरीकरण योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्याने अधिकृत साईटवरती अर्ज करणे गरजेचे आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा, नियम व अटी, अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याबद्दल संपूर्ण माहिती या लेखात आम्ही दिलेली आहे.

शेततळे अस्तरीकरण अनुदान योजना (Shet tale Astarikaran Yojana)

अस्तरीकरण योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास, शेतकऱ्याने शेततळ्याचे सर्व काम करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्याने ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसामध्ये आपली निवड होईल, https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या साईटवरती ऑनलाईन अर्ज भरता येईल. ऑनलाईन अर्ज भरताना पोर्टल वरती नवीन अर्जदार नोंदणी करावी लागते.

आपण जर यापूर्वी इतर योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला पोर्टल वरती पुन्हा नवीन नोंदणी करावी लागणार नाही, आपण लॉगीन करून अर्ज करू शकता, लॉगीन अर्ज कसा करायचा? तर शेतकरी मित्रांनो आपण पोर्टल वरती लॉगीन केल्यानंतर कृषी विभाग – अर्ज करा या पर्याय वरती क्लिक करावे, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना (मागेल त्याला अंतर्गत घटक) योजनेसमोरील बाबी निवडा बटन वरती क्लिक करा.

त्यानंतर नवीन पर्याय तुम्हाला पाहायला मिळेल, फलोत्पादन, सिंचन साधने व सुविधा आणि कृषी यांत्रिकीकरण हे तीन पर्याय दिसतील, त्यामधून तुम्हाला सिंचन साधने व सुविधा या पर्याय सामोरील Select बटन वरती क्लिक करावे आणि त्यामधून शेतातील तलावामध्ये प्लॅस्टिक अस्तरीकरण हा घटक निवडून Submit करा. नंतर तुम्हाला किती आकारमानाचा कागद शेत तळ्यामध्ये टाकायचा आहे ते परिमाण या ऑप्शन मधून निवडा. आणि जतन करा त्यानंतर अर्जाचे पेमेंट करा. अर्जाचे शुल्क भरल्यानंतर तुम्हाला अर्जाची पावती मिळेल.

शेततळे कागद अनुदान

कागदासाठी शेतकऱ्यांना ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते, आकारमाना प्रमाणे अनुदानामध्ये बदल होऊ शकतो. ७५ पर्यंत अनुदान मिळू शकते.

शेततळे अस्तरीकरण योजना कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • आधार कार्ड लिंक असलेले बँक पासबुक
  • जमिनीचा ७/१२, ८अ
  • शेतकऱ्याचा मोबाईल नंबर

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *