Biyane Anudan Yojana 2025 : बियाणे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरु

Biyane Anudan Yojana

Biyane Anudan Yojana 2025 : शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी, खरीप हंगाम 2025 करिता राज्यातील शेतकरी बांधवांना १००% अनुदानवर बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना MahaDBT Farmer Scheme महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.

या लेखामध्ये काय आहे.

Biyane Anudan Yojana

शासनाकडून शेतकरी बांधवांसाठी विविध शेती उपयोगी योजना राबविल्या जातात, योजनेमधून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. आता शेतकऱ्यांसाठी अनुदानामध्ये बियाणे दिले जाणार आहेत, यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरण्यासाठी शासनाने महाडीबीटी-MahaDBT पोर्टल वरती अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

खरीप हंगाम 2025 करीता MahaDBT Farmer Scheme पोर्टल वर प्रात्यक्षिक/प्रमाणित बियाणे अनुदान घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, मुग, उडीद, मका, बाजरी, भात इ. महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.

Biyane Anudan Yojana Last Date

बियाणे अनुदान योजना अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ मे २०२५ असणार आहे.व बियाणे अनुदान योजनेची सोडत १ ते ३ जुन या दरम्यान होईल.

Biyane Anudan Maharashtra

महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतने सादर केलेले अर्ज हे प्रथम प्राधान्य या पद्धतीने बियाणे सोडती साठी ग्राह्य धरले जातील, तसेच निवड झालेल्या लाभार्थींना त्यांच्या नोंदणीकृत असलेल्या मोबाईलनंबर वरती निवड झालेला मेसेज पाठविला जाणार आहे. ब निवड झालेल्या लाभार्थींनाच अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित कालावधीमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकरी अ https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

Similar Posts

Leave a Reply