कांदाचाळ अनुदान योजना अर्ज सुरु : Kanda Chal Anudan Yojana 2024
Kanda Chal Anudan Yojana 2024 : राज्यामध्ये कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत आहे शेतकरी कांदा ठेवण्यासाठी प्रामुख्याने दगडाची किंवा बांबू पाचट वापरून चाळ तयार करून त्यामध्ये कांदा साठवण करीत असतात.
परंतु बऱ्याचदा पावसामुळे हवामानामुळे कांदा खराब होतो यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत आणि टिकाऊपणा यावर देखील विपरीत परिणाम होतो. यामुळे (Kanda Chal Anudan Yojana) कांदा चाळ शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधल्यास त्याची गुणवत्ता राखली जाऊ शकते यामुळे शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल.
Kanda Chal Anudan Yojana 2024
कांदा चाळ साठी अनुदान किती आहे :
५ MT,१० MT,१५ MT,२० MT आणि २५ MT क्षमतेच्या कांदा चाळ बांधणी प्रमाणे अनुदान असेल. (३५०० रु. प्रति. मे.टन) (टीप : अनुदानामध्ये काही बदल होऊ शकतो.)
कांदा चाळ योजनेच्या लाभासाठी पात्रता? : (kanda chal Anudan online application)
- ७/१२, ८अ वरती शेतकऱ्याची नावे नोंद असावी.
- सातबारा वरती कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे गरजेचे आहे.
योजनेचा लाभ कोणी घेऊ शकेल?
- कांदा उत्पादक शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतील.
- शेतकऱ्यांचा गट.
- स्वयं सहाय्यता गट
- शेतकरी महिला गट.
- शेतकऱ्यांचे उत्पादक संघ.
- नोंदणीकृत शेती संबंधी संस्था.
- शेतकरी सहकारी संस्था.
- सहकारी पणन संघ.
योजनेचा उद्देश-kanda chal yojana
- कांदा पिकाचे साठवणुकीत होणारे नुकसान कमी करणे.
- हंगामामध्ये कांदा पिकाची आवक वाढवून कांद्याचे भाव कोसळणे व हंगामाव्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव वाढणे अशा समस्यांवर अंशतः नियंत्रण मिळवणे.
लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे? (Kandachal Anudan Yojana Documents)
७/१२, ८अ,आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते पासबुक, आधार कार्ड, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती शेतकरी असल्यास जात प्रमाणपत्र इ.
कांदा चाळ ऑनलाईन अर्ज 2024 (MahaDBT Kanda chal Anudan)
योजनेचे नाव | कांदाचाळ अनुदान योजना {kanda Chal Anudan Yojana} |
अर्ज कोठे करावा. | शेतकरी महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करू शकतात. |
अर्ज करण्यासाठी. | येथे क्लिक करा. |
अर्जाची पद्धत. | ऑनलाईन |
महाडीबीटी पोर्टल बद्दल माहिती हवी असल्यास | येथे क्लिक करा. |
महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज केल्यानंतर शेतकरी निवड झाल्यास नंतर ७/१२, ८अ, स्थळदर्शक नकाशा, DPR, चतु: सीमा, आधार क्रमांक लिंक असलेली (kanda chal anudan 2024) बँक खाते पासबुक ची छायांकित प्रत (अनु.जाती व अनु. जमाती असल्यास जात प्रमाणपत्र) तसेच बंधपत्र (प्रपत्र ४), हमीपत्र (प्रपत्र २) इ. कागदपत्रे आवश्यक राहतील.
कांदा चाळ बांधल्यानंतर पुरवठा दाराकडील बिले तसेच इतर कागदपत्रे.
Pl inform a new yojna and my name sinchan yojna select and not select pl inform
Dear sir,
After you apply on the portal, an SMS is sent if you are selected. Or we can check the items I have applied for by logging on to the portal.
If selected, application status will show as Winner. Or you can contact the Agriculture Officer