डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2024 | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana : मित्रांनो शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात शेतकरी योजना, ग्रामपंचायत योजना, जिल्हा परिषद, योजना पंचायत, समिती योजना, महाराष्ट्र योजना, विविध स्तरावर राबविल्या जातात.

या लेखात आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना साठी तुम्हाला अर्ज कसा/कोठे करायचा आहे.

त्यासाठी पात्रता काय असेल, याची आपण सविस्तर माहिती या लेखात पहाणार आहोत.

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana Information

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत विविध शेती उपयोगी साहित्य संच, जुनी विहीर दुरुस्ती, नवीन विहीर, पंपसंच, शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरण, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, इनवेल बोरिंग इ. घटकासाठी अनुदान दिले जाते.

लाभार्थी पात्रता?

  • लाभार्थी हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील असावा.
  • लाभार्थी शेतकऱ्याकडे त्याच्या नावे कमीत कमी 0.40 हे क्षेत्र असावे. तसेच जास्तीत जास्त 6.00 हे पर्यंत.
  • लाभार्थी शेतकऱ्यांचे वार्षिक एकूण उत्पन्न १५०००० पेक्षा कमी असावे.
  • लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • वैयक्तिक लाभार्थी अपंग व महिला असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल.

लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?

  • लाभार्थीच्या नावे असलेला ७/१२, ८अ
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक (आधार कार्ड लिंक असावे)
  • जात प्रमाणपत्र (SC/ST)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

योजनाडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
योजना सुरू कोणी केलीमहाराष्ट्र शासन
योजनेचे उद्दिष्टशाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे.
अर्ज कोठे करावामहाडीबीटी पोर्टल/MAHA DBT Portal
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
मिळणारा लाभअनुदान
Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *