ठिबक/तुषार सिंचनसाठी लागणारे हमीपत्र डाऊन+लोड करा : MahaDBT Hamipatra
MahaDBT Hamipatra – Parishishta 7 : शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वरती विविध योजनांचा लाभ दिला जातो. ठिबक/तुषार सिंचनासाठी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. तर काही शेतकऱ्यांना याचा लाभ देखील मिळाला आहे.”परिशिष्ट 7“
MahaDBT Hamipatra-महाडीबीटी हमीपत्र
ठिबक/तुषार सिंचन यासाठी अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना त्या अर्जाची पावती मिळते. काही दिवसानंतर लॉटरी काढली जाते. यामध्ये ज्या शेतकऱ्याची निवड होईल. अशा शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे कळविले जाते.
निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वरती १) आधार कार्ड २) बँक खाते पुस्तक ३) ७/१२ , ८अ सामाईक क्षेत्र असल्यास संमती पत्र इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. तसेच काही दिवसात त्यांना पूर्वसंमतीपत्र “mahadbt pre sanction letter” मिळते.
त्यानंतर शेतकरी ठिबक/तुषार सिंचन खरेदी करू शकतात. पुन्हा पोर्टल वरती बिल व इतर आवश्यक कागदपत्रे तसेच “परिशिष्ट 7” हे अपलोड करावे लागते.
हमीपत्र/परिशिष्ट 7 | डाऊन+लोड |