Tractor Anudan Yojana 2024; ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरु
Mahadbt Tractor Anudan Yojana 2024 : ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन फॉर्म सुरु आहेत, ट्रॅक्टरसाठी अर्ज कुठे करावा, कागदपत्रे कोणती लागतात, Tractor Anudan Yojana अनुदान किती मिळते? याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
Tractor Anudan Yojana 2024 : ट्रॅक्टर अनुदान योजना
आताची शेती म्हटलं कि मशागतीसाठी ट्रॅक्टर हा लागतो. काही वर्षापूर्वी बैलाच्या सहाय्याने शेतीची संपूर्ण मशागत केली जायची. अगदी पिक घरात येईपर्यंत, मशागत पेरणी करण्यापासून ते पिकाची वाहतूक करण्यापर्यंत हि सर्व कामे बैलाच्या सहाय्याने करीत. परंतु आता शेती करायची म्हटल कि ट्रॅक्टर आधी घेतात. ट्रॅक्टरमुळे पूर्ण दिवसाचे होणारे काम हे फक्त काही तासामध्येच होते. यामुळे वेळेची बचत होते. परंतु जर ट्रॅक्टर घ्यायचा म्हटल तर त्यासाठी खर्च जास्त येतो. परंतु शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही.
शासन शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच शेती संबधित सर्व औजारे आणि यंत्र इतर घटकासाठी अनुदान देते. यामुळे शेतकऱ्यांना यंत्र औजारे घेण्यासाठी मदत होते. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
MahaDBT Farmer Tractor Apply Online
महाराष्ट्र कृषी विभाग “कृषी यांत्रिकीकरण योजना/राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना” अंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयोगी औजारे, यंत्र आणि इतर साधने शेतकऱ्यांना अनुदानावर दिली जातात. योजनेमधून ट्रॅक्टर या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ mahadbt farmer पोर्टल वरती फॉर्म भरावा लागेल.
- शेतकरी घरबसल्या मोबाईल वरून किंवा ऑनलाईन सुविधा केंद्रावर जावून फॉर्म भरू शकतात.
- अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याने दिलेल्या मोबाईल नंबरवरती एसएमएस येईल. तसेच योजनेमध्ये निवड झाल्यानंतरसुद्धा शेतकऱ्याला मेसेज पाठविला जाईल.
Tractor scheme for farmers
ट्रॅक्टरकरिता शासनाकडून अनुदान किती मिळते आणि अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात? पहा.
महाडीबीटी पोर्टल वरील ट्रॅक्टर या घटकासाठी शासनाकडून खालीलप्रमाणे अनुदान दिले जाते. प्रत्यक्ष अनुदानामध्ये काही बदल होऊ शकतो.
१) 2WD/4WD – ट्रॅक्टर ८ बीएचपी ते २० बीएचपी पर्यंत असेल तर
सर्वसाधारण प्रवर्ग | अनु.जाती/अनु.जमाती प्रवर्ग/शेतकरी महिला/अल्पभूधारक शेतकरी/ बहुभूधारक |
---|---|
७५००० रु. पर्यंत | १००००० रु. पर्यंत |
२) 2WD/4WD – ट्रॅक्टरची क्षमता २० बीएचपी ते ४० बीएचपी पर्यंत असेल तर
सर्वसाधारण | अनु.जाती/अनु.जमाती/बहुभूधारक/महिला शेतकरी/अल्पभूधारक |
---|---|
१ लाख रु. पर्यंत | १ लाख २५ हजार रु. पर्यंत |
३) 2WD/4WD – ट्रॅक्टर ४० बीएचपी ते ७० बीएचपी पर्यंत असेल तर
सर्वसाधारण | अनु.जाती/अनु.जमाती/अल्पभूधारक/बहुभूधारक/शेतकरी महिला |
---|---|
१ लाख रु. पर्यंत | १ लाख २५ हजार रु. पर्यंत |
फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- सर्व प्रथम शेतकऱ्याचे आधार कार्ड
- आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते पुस्तक
- मोबाईल नंबर
- शेत जमिनीचा ७/१२ उतारा, ८अ
- मोबाईल नंबर