Mahamesh Yojana Labharthi List 2023 : राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेची अंतिम लाभार्थी यादी जाहीर झाली आहे. नागरिकांना हि यादी मोबाईल वरून पाहता येणार आहे. यादी कशी पहायची? याबद्दल सविस्तर माहिती वाचा.
Mahamesh Yojana Labharthi Final List
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी ज्या लाभार्थींनी अर्ज केले आहेत अशा लाभार्थींची प्राथमिक निवड यादी १ फेब्रुवारी २०२३ ते ७ फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध झाली होती. यादीमध्ये निवड झालेल्या लाभार्थींनी महामेष योजनेच्या पोर्टल वरती कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पर्याय देण्यात आला होता.
निवड झालेल्या लाभार्थ्यांनी पोर्टल वरती कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर लाभार्थींची अंतिम यादी प्रसिध्द होणार होती. आता लाभार्थींना अंतिम लाभार्थी निवड यादी महामेष योजनेच्या http://www.mahamesh.co.in/Menu/MahameshYojana या साईट वरती यादी पाहता येणार आहे.
महामेष योजना लाभार्थी निवड यादी कशी पहायची?
- मोबाईल मध्ये वरील वेबसाईट ओपन करा.
- लाभार्थ्याची प्राथमिक आणि अंतिम निवड यादी हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
- नवीन पेज पाहायला मिळेल त्यामध्ये लाभार्थ्याची प्राथमिक निवड यादी व लाभार्थ्याची अंतिम निवड यादी हे दोन पर्याय पाहायला मिळतील.
- प्राथमिक निवड यादी पहायची असल्यास पहिला पर्याय निवडावा.
- अंतिम निवड यादी पाहण्यासाठी लाभार्थ्याची अंतिम निवड यादी हा ऑप्शन निवडा.
100% accurate information and step by step explanation 👍
Thank You Sir