1 रुपयात पिक विमा योजना झाली सुरु : 1 Rs Pik Vima Maharashtra

1 Rs Pik Vima Maharashtra

1 Rs Pik Vima Maharashtra : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यासाठी खरीप हंगामातील पिक विमा योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. आता शेतकऱ्यांना १ रुपयामध्ये पिक विमा भरता येणार आहे.

या लेखामध्ये काय आहे.

1 Rs Insurance Scheme

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची तसेच महत्वाची अपडेट, प्रधानमंत्री फसल बिमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील पिकासाठी पिक विमा “1 Rs Pik Vima Maharashtra” ऑनलाईन भरण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. शेतकऱ्याने जर पिक विमा भरला असेल तर झालेल्या पिकाची नुकसान भरपाई संबधित विमा कंपनीकडून शेतकऱ्याला मिळू शकते.

योजनेचे नावप्रधानमंत्री फसल बिमा योजना
अधिकृत संकेस्थळhttps://www.pmfby.gov.in/
पिक पेरा स्वयंघोषणापत्र” डाऊनलोडPik Pera Form Pdf
pik pera swayam ghoshna patra

शेतकऱ्यांना सर्वसमावेशक पिक विमा योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. सर्व समावेशक पिक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना फक्त १ रुपयात पिक विमा भरता येणार आहे. म्हणजेच शेतकऱ्याच्या हिस्शाची विमा सरंक्षित रक्कम शासन भरणार आहे, शेतकऱ्यांना फक्त १ रुपया भरावा लागणार आहे.

1 Rs Pik Vima Online Apply

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेच्या अधिकृत साईटवरती शेतकऱ्यांना पिक विमा ऑनलाईन “Pik Vima Online Apply” भरता येईल, तसेच आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर, महा ई सेवा केंद्र किंवा ऑनलाईन सुविधा केंद्र याठिकाणी जाऊन सुद्धा शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज भरता येईल. शेतकऱ्यांना www.pmfby.gov.in या वेबसाईट वरती पिक विमा भरता येईल.

1 Rs Pik Vima Documents

  • आधार कार्ड
  • आधार कार्ड लिंक असलेले बँक पासबुक
  • ७/१२, ८अ
  • पिक पेरा स्वयंघोषणा पत्र
  • क्षेत्र सामाईक असल्यास संमती पत्र

1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra

  • शेतकऱ्याने पिक विमा भरल्यानंतर केलेल्या पिकाची ई पिक पाहणी करून घ्यावी, म्हणजेच पिकाची नोंद ७/१२ वरती करून घ्यावी.
  • पिक विमा भरताना संपूर्ण माहिती अचूक भरावी.
  • पिक विमा जमा होण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे.
  • आधार कार्ड, बँक खाते पासबुक व ७/१२ वरील नाव एकसारखे असावे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *