PM Kisan Yojana : 2000 रु. चा हप्ता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असतील अशा शेतकऱ्यांनी लगेच पीएम किसान योजनेचे स्टेटस चेक करावे.
PM Kisan yojana Status
तुम्हाला पण पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत ६००० रु मिळत असतील तर तुम्ही लगेच आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करावे. मागील काही दिवसापूर्वी पीएम किसान योजनेमध्ये लाभार्थींची भौतिक तपासणी करण्यात आली असून यामध्ये बरेच अपात्र ठरलेले आहेत.
यामुळे त्यांना १२ व्या हप्त्याचे २००० रु त्यांना मिळाले नाहीत. तुम्हाला पण १२ वा हप्ता मिळला नसेल तर आपण लगेच आपले स्टेट्स चेक करा.
फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पुढील हप्ता.
- स्टेटसमध्ये Aadhaar Demo Authentication Status : Success असावे.
- eKYC Done : YES असे असणे गरजेचे आहे.
- Eligibility : YES असेल तरच तुम्हाला पुढील हप्ता मिळेल.
- Payment Mode : AADHAAR
- Land Seeding : YES
वरील प्रमाणे स्टेटस असेल तरच पुढील हप्ता मिळणार आहे.
खालील शेतकऱ्यांना मिळणार नाही पुढील २००० रु हप्त्याचा लाभ?
- ज्या शेतकऱ्यांनी आधार केवायसी केली नसेल त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.
- स्टेटसमध्ये जर eKYC Done : NO, Eligibility : NO तसेच Land Seeding : NO असे दाखवत असेल तर त्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.