PM Kisan : १२ वा हप्त्याचे स्टेटस चेक करा मोबाईलवर
Pm kisan status check : १२ हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविला आहे. १२ व्या हप्त्याचे स्टेटस कसे पहायचे पहा.
दि.१७/१०/२०२२ रोजी पीएम किसान योजनेचा १२ हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे.
12th installment pm kisan status check
स्टेटस पाहण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत.
- १) मोबाईल नंबर – आपण फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिला होता त्या वरून स्टेटस चेक करता येईल.(कडबाकुट्टी मशीन योजना नवीन फॉर्म ऑनलाईन सुरु)
- २) पीएम किसान नोंदणी क्रमांक – हा नंबर KYC करताना जो मोबाईल नंबर दिला होता. त्याद्वारे PM KISAN आपण नोंदणी क्रमांक शोधू शकता.
१२ व्या हप्त्याचे स्टेटस पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- PM Kisan अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- किंवा https://pmkisan.gov.in/
- वेबसाईट वरती खालच्या बाजूला Farmer Corner हा पर्याय दिसेल.
- farmer corner मध्ये Beneficiary Satus ऑप्शन दिसेल तो निवडा.
- नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये Mobile Number आणि Registration Number हे दोन ऑप्शन दिसतील.
- आपण मोबाईल नंबर ने पाहणार असाल तर Mobile Number पर्याय निवडा.
- आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका. खालील चौकोनात कोड भरून Get Data वरती क्लिक करा.
- आपल्याला १२ व्या हप्त्याचे स्टेटस पहायला मिळेल.