मेंढी पालनास मिळणार ७५% अनुदान: Raje Yashwantrao Mahamesh Yojana
Raje Yashwantrao Mahamesh Yojana: राजे यशवंतराव होळकर महामेश योजना अंतर्गत मेंढी पालनास मिळणार ७५% अनुदान. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
यालेखात आपण योजनेसाठी अनुदान किती असेल,पात्रता, अर्ज कोठे करावा, योजनेची माहिती, अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे याबद्दल सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.
Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana
राजे यशवंतराव होळकर महामेश योजना हि २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून राबविण्यात येत आहे. यामध्ये मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळून इतर ३५ जिल्ह्यांमध्ये हि योजना राबविली जाते. या योजनेमध्ये मुख्य सहा घटकांचा समावेश आहे.
राजे यशवंतराव होळकर महामेश योजना
योजनेचे नाव | राजे यशवंतराव होळकर महामेश योजना |
कधी सुरु केली | २०१७-१८ आर्थिक वर्षापासून |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
लाभार्थी प्रवर्ग | भटक्या जमाती (भज-क) |
अनुदान किती असेल.
एकूण मेंढी पालन गटाची किंमत-लाभार्थीला स्वहिस्सा २५% भरावा लागणार आहे. शासनाकडून ७५ % अनुदान मिळेल.