राजे यशवंतराव होळकर महामेश योजना : Raje Yashwantrao Mahamesh Yojana

Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana : राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेसाठी दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ पासून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी लाभार्थीला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
Raje Yashwantrao Mahamesh Yojana
राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेसाठी आपण मोबाईल ॲप द्वारे किंवा वेबसाईट वरून आपण फॉर्म भरू शकता. किंवा जवळील ऑनलाईन सुविधा केंद्र/कॉमन सर्व्हिस सेंटर/आपले सरकार सेवा केंद्र याठिकाणी जाऊन आपला अर्ज भरू शकता.
योजनेबद्दल थोडक्यात माहिती.
योजनेचे उद्दिष्ट | मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहन देणे. |
अर्ज कोठे करावा | http://www.mahamesh.co.in/en |
अर्ज सुरु दिनांक | १५ नोव्हेंबर २०२२ |
अंतिम मुदत | ३० नोव्हेंबर २०२२ |
मिळणारा लाभ | २० मेंढ्या + १ मेंढा नर या गटासाठी ७५% अनुदान इ. |
जाहिरात | पहा |
शासन निर्णय पहा | पहा |
अनुदान किती असेल?

पात्रता?
- हि योजना भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गासाठी आहे.
- अर्जदाराचे वय १८ वर्षे ते ६० वर्षे दरम्यान असावे.
- पशुसंवर्धन विभागातून मागील ३ वर्षात लाभ घेतला असल्यास त्या कुटुंबातील व्यक्तीस लाभार्थीस या योजने अंतर्गत लाभ घेता येणार नाही.
- लाभार्थी निवड – अपंगाकरीता ३% महिलांकरिता ३०% आरक्षण.
- कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येणार आहे.
- लाभार्थीने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला असल्यास पुन्हा लाभ घेता/अर्ज करता येणार नाही.
- अधिक माहितीसाठी वरील जाहिरात पहा.