सौर कृषी पंप योजना ऑनलाईन फॉर्म सुरु; Solar Pump Yojana Online Application
Maharashtra Solar Pump Yojana Online Application : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, सोलर पंप योजनेकरिता ऑनलाईन अर्ज/फॉर्म सुरु करण्यात आले आहेत. योजनेबद्दल माहिती, अर्ज कुठे करायचा? आवश्यक कागदपत्रे? याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Solar Pump Yojana Online Application
बऱ्याच दिवसापासून शेतकरी सौर कृषी पंप योजनेचे अर्ज सुरु होण्याची वाट पाहत होते, अखेर प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेचे अर्ज सुरु झाले आहेत. आपल्या जिल्ह्यात कोटा उपलब्ध असल्यास आपण अर्ज करू शकता.
हे पण वाचा : आपल्या जिल्ह्यात कोटा शिल्लक आहे का असे चेक करा पहा.
प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेसाठी फॉर्म सुरु झाले आहेत. योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९०% अनुदान असणार आहे. उर्वरित १०% रक्कम स्वतः भरायची आहे. तसेच अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५% अनुदान. उर्वरित ५% रक्कम स्वहीस्सा भरावा लागेल.
महाराष्ट्र शासनामार्फत “सौर पंप” मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना “mukhyamantri solar pump yojana” आणि पीएम कुसुम सोलर योजना “PM Kusum Solar Krushi Pump Yojana” या दोन योजना राबविल्या जातात. या दोन्ही योजनेतून मिळणारे अनुदान हे समान आहे. परंतु अटी व शर्ती यामध्ये बदल आहेत.
हे पण वाचा : तुम्हाला किती HP चा सोलर पंप मिळणार पहा
अर्ज कुठे करावा? {solar pump yojana}
- अर्ज करण्यासाठी पोर्टल वरती नोंदणी करावी लागेल.
- मोबाईल मध्ये https://www.mahaurja.com/meda/ हि साईट ओपन करावी.
- नंतर तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे महा उर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकता.
- शेतकऱ्यांनी अर्ज अचूक भरावा कारण एकदा अर्ज भरल्या नंतर पुन्हा त्यामध्ये बदल करता येणार नाही.
- जवळील ऑनलाईन सुविधा केंद्र, CSC, आपले सरकार सेवा केंद्र येथे सुद्धा आपण अर्ज करु शकता.
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे?
- शेतकरी अर्जदाराचे आधार कार्ड
- बँक खाते पासबुक
- ७/१२, ८अ (पाण्याची स्त्रोताची नोंद असणे अनिवार्य आहे)
- १ फोटो (maharashtra “solar pump yojana” online application)
- अनु.जा/अनु.ज. असल्यास जात प्रमाणपत्र/दाखला
- विहीर, बोरवेल, शेततळे, (पाण्याचा स्त्रोत) क्षेत्र, सामाईक असेल तर स्टँप पेपर वरती संमती पत्र घ्यावे लागेल.
- अर्ज करण्याचा कालावधी हा पूर्णपणे सोलर पंपाच्या कोटा वरती अवलंबून असेल, पंपाचा कोटा संपल्यानंतर अर्ज करता येणार नाही.
- अर्जदार नोंदणी करताना आपल्या जिल्ह्यात किती सोलर पंपाचा कोटा शिल्लक आहे. याची संपूर्ण माहिती दाखविली जाईल.