ULPIN वरून ७/१२ काढता येणार
ULPIN Maharashtra : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना ७/१२ काढायचा असेल तर ULPIN वरून काढता येणार आहे.
ULPIN Maharashtra
मागील काही दिवसापूर्वी प्रत्येक ७/१२ ला एक ULPIN मिळला आहे. ULPIN म्हणजेच (Unique Land Parcel Identification Number) अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक होय. ULPIN वरून ७/१२ काढण्यासाठी सात-बाराचा ULPIN माहिती असणे गरजेचे आहे.
ULPIN वरून ७/१२ कसा काढायचा?
- प्रथम https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr भेट द्या.
- खालील प्रमाणे तुम्हाला दोन पर्याय पाहायला मिळतील त्यामधून OTP Based Login पर्याय निवडा.
- Enter Mobile Number – आपला मोबाईल नंबर टाका.
- Send OTP वर क्लिक करा.
- Enter OTP – मोबाईल नंबर वरती आलेला ६ अंकी ओटीपी टाका. आणि ओटीपी Verify करावा.
- आपण पोर्टल वरती यशस्वीरीत्या लॉग-इन व्हाल.
- ULPIN वरून ७/१२ काढण्यासाठी आपल्याला काही शुल्क (१५ रु) भरावे लागेल. प्रथम तुम्हाला रिचार्ज करावा लागेल.
- रिचार्ज करण्यासाठी..
- रिचार्ज करण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, युपीआय, क्यूआर कोड इ. पर्याय उपलब्ध आहे.
- रिचार्ज झाल्यानंतर आपण होम पेज वरती वरती दाखवल्याप्रमाणे Digitally Signed 7/12 पर्याय वर क्लिक करा.
- Do you know ULPIN (आपल्याला यूलपिन क्रमांक माहिती आहे का?) समोरील चौकोनात क्लिक करा.
- ULPIN टाकून Verify वरती क्लिक करा.
- आपला जिल्हा,तालुका गाव,गट नंबर माहिती दिसेल.
- सर्व माहिती बरोबर असल्यास Confirm वर क्लिक करू शकता.
- OK वरती क्लिक करून खाली Down*load वर क्लिक करा.
अप्रतिम लिखाण
धन्यवाद सर