MahaDBT Workflow; शेतकरी अर्जाची अशी केली जाते तपासणी पहा

MahaDBT Workflow

Mahaonline Farmer Workflow : शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेकरिता https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या पोर्टल च्या माध्यमातून अर्ज मागविले जातात. परंतु अर्ज केल्यानंतर काय?, निवड कशी होणार? आणि निवड झाल्यानंतर काय प्रोसेस असते? याबाबत सविस्तर माहिती येथे दिलेली आहे.

या लेखामध्ये काय आहे.

MahaDBT Workflow

शेतकऱ्यांना शेती संबधित औजारे, यंत्र, सिंचन साधने व सुविधा किवा इतर योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल म्हणजेच https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या वेबसाईट वरती अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी पोर्टल वरती नोंदणी करावी लागेल. नंतर पोर्टलवर लॉग-इन करून अर्ज करावा.

शेतकरी योजना पोर्टलपहा
शेतकरी अर्ज छाननी पोर्टलपहा
MahaDBT Workflow

अर्ज केल्यानंतर आपला अर्ज कृषी खात्याकडे जाईल. महाडीबीटी शेतकरी MahaDBT Farmer पोर्टल वरील लाभार्थी निवड हि लॉटरी पद्धतीने केली जाते. लॉटरी/सोडत झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे, त्यांना मोबाईल एसएमएस/SMS द्वारे शेतकऱ्यांना कळविले जाते.

निवड झाल्यानंतर पुढे काय?-Mahadbt Farmer

  1. शेतकऱ्याची एखाद्या योजनेसाठी निवड झाल्यानंतर त्यांना मेसेजद्वारे/एसएमएस द्वारे कळविले जाईल.
  2. Mahadbt portal – महाडीबीटी पोर्टल वरती शेतकऱ्यांना निवड झालेल्या योजनेसंबधित कागदपत्रे अपलोड करावी लागतील याकरिता काही दिवसाची मुदत देण्यात येते. विहित कालावधीत कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करणे गरजेचे आहे. अन्यथा निवड रद्द केली जाऊ शकते.
  3. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्रे कृषी सहाय्यक अधिकारी (Agriculture Asistant) पुढील प्रोसेस यांच्याकडे तपासणी करिता जातात.
  4. यामध्ये शेतकऱ्याने अपलोड केलेली कागदपत्रे व अर्जामधील माहिती कागदपत्राची पडताळणी/तपासणी केली जाते.
  5. कागदपत्रे तपासणी केल्यानंतर पूर्व संमतीपत्र करिता पुढील डेस्कला पाठविली जातात. कागदपत्रे बरोबर असतील तर शेतकऱ्यांना पूर्वसंमती पत्र दिले जाते.
  6. पूर्वसंमती पत्र मिळाल्या नंतर शेतकरी वस्तूची खरेदी करू शकतात, इतर काम असेल तर स्थळ पाहणी (Site Inspection) केली जाते.
  7. शेतकऱ्यांना पोर्टल वरती पुन्हा बिल व संबधित इतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्या नंतर पुन्हा वस्तू/कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी (Physical Verification) केली जाईल.
  8. पुढील कार्यवाहीसाठी अर्ज पुढे पाठविला जाईल. सर्व माहिती कागदपत्रे बरोबर असतील तर अर्ज मंजूर केला जाईल.
  9. अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदान लाभार्थी शेतकऱ्याच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात पाठविले जाईल.

Mahaonline Farmer Workflow

शेतकरी अर्ज
⇩
लॉटरी लिस्ट/शेतकरी निवड
⇩
अर्जाची छाननी प्रक्रिया
⇩
अनुदानाचे वितरण

Similar Posts

One Comment

  1. सोलर पंप योजना लॉटरी यादी 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *