शेततळे अनुदान योजना 2024 ऑनलाईन अर्ज सुरु; Shettale Anudan Yojana Maharashtra

Shet tale Anudan Yojana

Shettale Anudan Yojana Maharashtra : शेती म्हंटल कि, त्यासाठी लागणारी साधने, पाण्याचा स्त्रोत, औषधे, बि-बियाणे इ. गरज पडते. शेतामध्ये जर एखादे पिक घ्यायचे असेल तर सर्व प्रथम आपण आपल्याकडे उपलब्ध होणारे पाणी या वरती शेतकरी बरीचशी पिके घेतो.

Shettale Anudan Yojana Maharashtra

पावसाळ्यामध्ये शक्यतो विहीर, बोरवेल इ. मध्ये पाण्याची कमतरता भासत नाही. हिवाळ्यामध्ये हळू-हळू पाण्याची कमतरता भासते, पिकाला जर वेळेवरती पाणी नाही मिळाले तर उत्पन्न कमी निघू शकते. उन्हाळ्यामध्ये तर काही शेतकरी पिक घेत नाहीत. कारण उन्हाळ्यात विहीर, बोरवेलचे पाणी कमी होऊ लागते. परंतु शेतकऱ्याने जर आपल्या शेतामध्ये शेततळे केले तर त्याचा त्याला नक्कीच फायदा होईल.

लाभार्थी घटकशेततळे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
लाभार्थीशेतकरी
अर्ज कुठे करावाMahaDBT Farmer Portal
mahadbt farmer scheme

शेततळे अनुदान योजना 2024 महाराष्ट्र | Shettale Anudan Yojana

शासन शेतकऱ्यांना शेततळे करण्यासाठी अनुदान देते. तसेच शेततळ्याचे अस्तरीकरण करण्यासाठीसुद्धा अनुदान मिळते. यामुळे शेतकऱ्यांना शेततळे करण्याकरिता नक्कीच फायदा होणार आहे. या लेखातमध्ये “Shettale Anudan Yojana” तुम्हाला शेततळे योजनेबद्दल माहिती तसेच अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कुठे करावा, प्रोसेस काय आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे.

शेतकरी “वैयक्तिक शेततळे” करितासुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच “सामुहिक शेततळे” (सामाईक शेततळे) करितासुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

शेततळे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Shettale Yojana Maharashtra)

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते पासबुक
  • जात प्रमाणपत्र (अनु.जाती, अनु. जमाती प्रवर्गातील असल्यास)
  • मोबाईल नंबर
  • शेतीचा ७/१२, ८ अ उतारा
  • PAN Card (असेल तर)

शेततळ्यासाठी अनुदान किती मिळते? (Shettale Subsidy In Maharashtra)

१) शेततळ्यासाठी साधारण ७५ हजार रु. अनुदान मिळते. २) शेततळे (शेततळे कागद अनुदान) अस्तरीकरणासाठी वेगळे अनुदान आहे.

(अनुदानामध्ये काही बदल होऊ शकतो)

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे नावे किमान ०.६० हे.आर म्हणजेच दीड एकर क्षेत्र असणे गरजेचे आहे.
  • अनुदान आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल.
  • लाभार्थी शेतकऱ्याला पूर्वसंमती पत्र मिळाल्याशिवाय काम सुरु करू नये.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *