छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना अर्ज सुरु ; Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana

Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana

Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना सुरु केली आहे. योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला विविध घटकाचा लाभ घेता येणार आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana

शासनाने दिनांक १८ ऑक्टोंबर २०२३ छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना बद्दल शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे , शेततळे अस्तरीकरण, फळबाग लागवड, शेडनेट, हरितगृह, ठिबक सिंचन, आधुनिक पेरणी यंत्र (BBF), कॉटन श्रेडर इ. घटकाचा लाभ घेता येणार आहे, तसेच मागेल त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांना वरील पैकी कोणत्याही घटकासाठी मागणी अर्ज केल्यानंतर तातडीने लाभ देण्यासाठी शासनाने हि छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना सुरु केली आहे. लाभार्थींना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये सदर योजनेचा लाभ दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी शेतकरी महाडीबीटी पोर्टल वरती सुविधा/पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे.

योजनेचे नावछत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना
लाभार्थीशेतकरी
शासन निर्णय दिनांक१८ ऑक्टोंबर २०२३
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
“Chhatrapati Shivaji Maharaj Krushi Yojana”

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे/माहिती खालीलप्रमाणे

  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड झेरॉक्स
  • आधार कार्ड लिंक असलेल बँक खाते पुस्तक झेरॉक्स
  • मोबाईल नंबर
  • शेतीचा ७/१२ व ८ अ उतारा

शेतकरी ऑनलाईन मोबाईलवरून https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/ या पोर्टल वरती अर्ज करू शकतात, किंवा आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र/ऑनलाईन सुविधा केंद्रावर जावून अर्ज करू शकतात.

Similar Posts

Leave a Reply