नमो शेतकरी योजनेचे स्टेटस असे चेक करा : Namo Shetkari Yojana Beneficiary Status

Namo Shetkari Yojana Beneficiary Status

Namo Shetkari Yojana Beneficiary Status : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात सुरु झाली असून पात्र लाभार्थी शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रती वर्ष ६ हजार रू मिळणार आहेत.

Namo Shetkari Yojana Beneficiary Status

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा २००० रु. चा पहिला हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात पाठविण्यात आला आहे. या लेखामध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा “namo shetkari status” हप्ता मिळाला का? कोणत्या बँक खात्यात जमा झाला? व कधी जमा झाला? याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत.

योजनेचे स्टेटस आपण मोबाईल वरून घरबसल्या पाहू शकता. सदरील योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी शासनाने नवीन पोर्टल/वेबसाईट सुरु केली आहे. पोर्टल वरती योजनेचे स्टेटस चेक करता येणार आहे.

योजनानमो शेतकरी महासन्मान निधी योजना
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
स्टेटस पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://nsmny.mahait.org/
Namo Shetkari Yojana Beneficiary Status

नमो शेतकरी योजना स्टेटस-Namo Shetkari Status

नमो शेतकरी योजनेचे स्टेटस आपण मोबाईल नंबर द्वारे चेक करू शकता. तसेच नोंदणी क्रमांकाद्वारे सुद्धा स्टेटस चेक करता येणार आहे. स्टेटस चेक करण्यासाठी स्टेप फॉलो करा.

  • शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण मोबाईल मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची https://nsmny.mahait.org/ हि साईट मोबाईल मध्ये ओपन करावी.
  • साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला खालील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे Login आणि Beneficiary Status हे दोन पर्याय दिसतील.
Namo Shetkari Status
Namo Shetkari Status
  • स्टेटस चेक करण्यासाठी Beneficiary Status ऑप्शन वरती क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल त्याठिकाणी तुम्हाला Mobile Number आणि Registration Number हे दोन पर्याय दिसतील.
  • मोबाईल नंबरद्वारे स्टेटस चेक करायचे असल्यास आपण Mobile Number हा पर्याय निवडू शकता.
  • मोबाईल नंबर चौकोनात आपला मोबाईल नंबर टाकून खालील चौकोनात Captcha कोड टाकावा आणि Get Data पर्याय वरती क्लिक करा. तुम्हाला खालील प्रमाणे स्टेटस दिसेल.
namo shetkari status check online
namo shetkari status check online

रजिस्ट्रेशन नंबर कसा शोधायचा? (namo shetkari yojana status check)

मोबाईल नंबरद्वारे जर स्टेटस दाखवत नसेल तर आपण रजिस्ट्रेशन नंबर द्वारे स्टेटस चेक करू शकता. यासाठी Mobile Number ऐवजी Registration Number पर्याय निवडावा. रजिस्ट्रेशन नंबर माहित नसल्यास Know Your Registration No. या पर्याय वरती क्लिक करावे. त्यानंतर Aadhaar Number पर्याय निवडा.

  • Enter Aadhar Number पर्यायामध्ये आपला आधार क्रमांक टाकावा. व Captcha कोड टाकून Get Aadhar OTP ऑप्शन वरती क्लिक करावे.
  • आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक सहा अंकी ओटीपी जाईल तो ओटीपी टाकावा त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन क्रमांक पाहायला मिळेल.
  • रजिस्ट्रेशन क्रमांक टाकून आपण योजनेचे “Namo Shetkari Yojana Beneficiary Status” स्टेटस पाहू शकता.
  • अशा प्रकारे आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजेनेचे स्टेटस मोबाईल वरून पाहू शकता. योजनेच्या अधिक माहितीसाठी-येथे क्लिक करा

Beneficiary Status

Farmers can now check the status of Namo Shetkari Yojana from their mobiles phones. friends in this article you are given complete information about how to check the beneficiary status of namo shetkari yojana. Government launched a new website of Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana for farmers.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *