Crop Insurance Maharashtra; फक्त १ रुपयात भरता येणार पिक विमा

Crop Insurance Maharashtra

Crop Insurance maharashtra : पीकविमा संदर्भात शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण अशी “Crop Insurance Maharashtra” योजना सुरु केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.

या लेखामध्ये काय आहे.

Crop Insurance Maharashtra

अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. शेतकरी वेगवेगळी पिके शेतामध्ये घेत असतात, अनेकदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे, मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांचे जर त्या पिकाचा, विमा उतरवला असेल तर त्याला काही प्रमाणात नुकसान झालेल्या पिकांची, झाडांची नुकसान भरपाई रक्कम मिळू शकते.

शेतकऱ्याने दरवर्षी पिकाचा,फळबागेचा विमा करणे गरजेचे आहे, आता शासनाने शेतकऱ्यांसाठी विमा संबधित “सर्वसमावेशक पीक विमा योजना” (एक रुपयात पिक विमा) सुरु केलेली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता फक्त एक रुपयामध्ये पिक विमा भरता येणार आहे. सर्वसमावेशक पिक विमा योजना हि सन २०२३-२४, २०२४-२५ व २०२५-२६ या तीन वर्षाकरिता राबिविली जाणार आहे.”1 rs pik vima”

सर्वसमावेशक पिक विमा योजना 2023

अर्थ संकल्पीय भाषणामध्ये शेतकऱ्यांना १ रुपयामध्ये पिक विमा योजनेचा लाभ देण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. आता या योजनेचा २३ जून २०२३ रोजी मान्यता देनेबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे.

शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी विम्याची रक्कम हि १ रुपया भरावयाची आहे. उर्वरित फरकाची/शेतकऱ्याच्या हिस्शाची रक्कम हि राज्य शासनामार्फत भरली जाणार आहे.

योजनेचे नावसर्वसमावेशक पिक विमा योजना
लाभार्थी वर्गशेतकरी
वर्ष२०२३
Crop Insurance Maharashtra

सदरील योजना सन २०२३-२४ पासून राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांना सदरील पिक विमा हा कॉमन सर्व्हिस सेंटर (सामाईक सुविधा केंद्र) किंवा बँकेद्वारे भरता येईल. तसेच हि योजना खरीप व रब्बी हंगामकरिता हि योजना राबविली जाणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *