नुकसान भरपाईचे पैसे मिळाले का असे येथून चेक करा : Nuksan Bharpai Status

nuksan bharpai status

Nuksan Bharpai Status : दुष्काळ निधी/नुकसान भरपाई मागच्या काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी अर्ज भरून दिले होते, त्यानंतर शेतकऱ्यांना दुष्काळ निधी/नुकसान भरपाई चे पैसे मिळण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे.

या लेखामध्ये काय आहे.

Nuksan Bharpai Status

शासनाकडून मागच्या काही महिन्यापूर्वी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई मदत अनुदान मिळण्यासाठी फॉर्म भरून घेतले होते, (ग्रामपंचायत घरकुल यादी पहा) फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत अनुदान मिळण्याकरिता केवायसी/KYC करावी लागते.

ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मदत अनुदान मिळण्यासाठी केवायसी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मदत जमा झालेली आहे, ज्या शेतकऱ्यांची केवायसी करूनसुद्धा नुकसान भरपाई मदत जमा झाली नसेल तर आपण स्टेटस चेक करू शकता. नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जम होत आहे. स्टेटस चेक करण्यासाठी शेतकऱ्याकडे विशिष्ट क्रमांक असणे आवश्यक आहे.

नुकसान भरपाई अनुदान स्टेटस

स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याकडे विशिष्ट क्रमांक असणे गरजेचे आहे, “Nuksan Bharpai Status” स्टेटस आपल्याला किती अनुदान मिळाले, आपली केवायसी झाली आहे का? आणि कोणत्या बँकेमध्ये अनुदान झाले, बँक खाते क्रमांक, अनुदान जमा झाल्याची तारीख याची संपूर्ण माहिती आपल्याला स्टेटस मध्ये पाहायला मिळेल. स्टेटस चेक करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • सर्वप्रथम स्टेटस चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला खालील फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे विशिष्ट क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल.
nuksan bharpai anudan status
nuksan bharpai anudan status
  • VK Number म्हणजेच विशिष्ट क्रमांक आपल्याला चौकोनामध्ये भरावा लागेल.
  • विशिष्ट क्रमांक आपल्याला माहिती नसेल तर आपण ज्या ठिकाणी केवायसी/KYC केली त्याठिकाणी (आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र) तुम्हाला आपला यादीतील विशिष्ट क्रमांक मिळेल.
  • विशिष्ट क्रमांक चौकोनामध्ये टाकून Submit बटन वरती क्लिक करा. तुम्हाला दुष्काळ निधी अनुदानाचे स्टेट्स पाहायला मिळेल

Similar Posts

Leave a Reply