शेतीचे वाद मिटणार : 2000 रु. मध्ये जमीन नावावर होणार : Salokha Yojana Maharashtra

Salokha Yojana Maharashtra

Salokha Yojana Maharashtra : शेती म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, शेतीमध्ये होणारे वाद यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि भावा-भावामध्ये (कुटुंबामध्ये) तसेच शेतकऱ्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.

यामध्ये अनेक पिढ्यांचे नुकसान देखील होत आहे. यामुळे महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी सलोखा योजना “Salokha Yojana Maharashtra” सुरु केली आहे.

Salokha Yojana Maharashtra; सलोखा योजना महाराष्ट्र

न्यायालयामध्ये शेती संबधित होणारे वादाचे कोट्यवधी प्रकरणे प्रलंबित आहे. यामध्ये मालकी हक्क, शेत जमिनीच्या रस्त्याचे वाद, शेतजमीन वाहिवाटीचे वाद, मोजणीवरून होणारे वाद, बांधावरून होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबत होणारे वाद, शेत जमिनीच्या अतिक्रमणावरून होणारे वाद, भावा-भावामध्ये वाटणी संदर्भात होणारे वाद आणि अभिलेखामध्ये चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद इ. वाद हे समाजामध्ये दिसून येत आहेत. हे आपापसांतील होणारे वाद मिटविण्याकरिता आणि समाजामध्ये/कुटुंबामध्ये/भावा-भावामध्ये होणारा दुरावा कमी करून सलोखा निर्माण व्हावा याकरिता शासनाने “सलोखा योजना” हि सुरू केली आहे.

“सलोखा योजना” फायदा काय होणार?

एका शेतकऱ्याच्या नावावरील “salokha yojana” जमिनीचा ताबा हा दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर करणे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीचा ताबा, पहिल्या शेतकऱ्याच्या नावावर करणे. म्हणजेच अदलाबदल करणे, या दस्ताकरिता मुद्रांक शुल्क हे फक्त १०००/- रु आणि दस्त नोंदणी फी हि फक्त १०००/- रु सवलत देण्याबाबत हि योजना आहे.

या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना होणार व कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही, तसेच आपले काही प्रश्न असल्यास याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी दि. ०३/०१/२०२३ सलोखा योजनेचा शासन निर्णय पाहावा.

सलोखा योजनेबद्दल थोडक्यात माहिती.

योजनेचे नावसलोखा योजना (Salokha Yojana marathi)
शासन निर्णयपहा
हि योजना शेतजमीन व्यतिरिक्त इतर प्लॉट, दुकान व घर तसेच अकृषिक जमिनीसाठी लागू असेल का? नाही
Salokha Yojana Maharashtra gr

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *