शारदा शेतकरी – माता भगिनी अर्थसहाय्य योजना (Sharda Shetkari Mata Bhagini Yojana)
Sharda Shetkari Mata Bhagini Yojana : जिल्हा परिषदेकडून शेतकरी महिलांना अर्थसाह्य देण्यात येत आहे. हे अर्थ सहाय्य डीबीटी (Direct Benifit Transfer) पद्धतीने दिले जाईल. यासाठी अटी व शर्ती,अर्ज,पात्रता काय आहे. याची माहिती या लेखात देण्यात आली आहे.
ही योजना १०० टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे, तसेच जिल्हा परिषद पुणे सन २०२२-२०२३ जिल्हा परिषद निधी अंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे.
शारदा शेतकरी माता भगिनी योजना | Sharda Shetkari Mata Bhagini Yojana
पात्रता.
- “शारदा” शेतकरी माता भगिनी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत खालील शेतकरी महिला लाभ घेण्यास पात्र राहतील.
- निराधार शेतकरी महिला, घटस्फोटीत शेतकरी महिला, ग्रामीण भागातील विधवा शेतकरी महिला,परीतक्त्या शेतकरी महिला इ. महिला “शारदा” शेतकरी- माता भगिनी योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
- शारदा शेतकरी माता भगिनी योजनेचा शेतकरी महिलांना नक्कीच फायदा होणार आहे.
- शेतकरी महिलांना शेतीच्या पीक पेरणी, बियाणे, मशागत करणे, खते, कीटकनाशके इत्यादी खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत?
- वरीलप्रमाणे (पात्रता वाचा) तसेच
- सर्व प्रवर्गातील निराधार,घटस्फोटीत,ग्रामीण भागातील विधवा,परीतक्त्या शेतकरी महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- वयाची अट – १८ ते ६५
- दिलेल्या आर्थिक सहाय्याचा शेतीच्या कामासाठी वापर करावा.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?
- आधार कार्ड,बँक पासबुक, ७/१२, ८अ उतारा.(Self Attested)
- शौचालय वापर करीत असलेबाबतचे स्वयं घोषणापत्र.
योजनेचे नाव | “शारदा” शेतकरी-माता भगिनी अर्थसहाय्य योजना |
जिल्हा परिषद | पुणे |
अर्ज करण्याचा कालावधी | २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत |
अर्जाचा नमुना | पहा |
पुणे जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ | येथे पहा |
अधिक माहिती | पहा |
अतिमहत्वाचे : लाभार्थीने खोटी माहिती किंवा खोटी कागदपत्रे दिलेली आढळल्यास मिळालेला लाभ पुन्हा करावा लागेल.