Aapli Chawdi; गावातील खरेदी विक्री व्यवहाराची संपूर्ण माहिती पहा मोबाईलवर

Aapli Chawdi

Aapli Chawdi : गावातील प्रत्येक शेतकऱ्याला हि माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे, आपल्या गावातील शेतजमिनीचे चालू व्यवहाराची माहिती मोबाईलवरती कशी पहायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला (Aapli Chawdi) यालेखामध्ये दिलेली आहे.

Aapli Chawdi – आपली चावडी

आपली चावडी पोर्टल बद्दल प्रत्येक नागरिकाला माहिती असावी, आपली चावडी पोर्टल वरती नागरिकांना गावातील शेतजमीन खरेदी विक्रीची संपूर्ण माहिती तसेच आपल्या गावातील चालू फेरफार इ. माहिती मिळणार आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि आपण दुसऱ्या व्यक्तीच्या व्यवहाराची माहिती पाहणे का गरजेचे आहे? आणि हे योग्य आहे का? तर मित्रांनो बऱ्याचदा काय होते एखादी शेतकऱ्याच्या जमिनीच्या शेजारची जमीनमध्ये कोणत्यातरी कारणावरून काही वाद विवाद सुरु असत्तात, आणि विरुद्ध पार्टी ती जमीन बाहेरील व्यक्तीला विकते. यामुळे काय होते त्या जमिनी संदर्भात सुरु असलेले वाद हे वाढतात. नवीन खरेदीदारास जमिनीच्या वादाबाबत कल्पना नसते. आणि तो ती जमीन खरेदी करतो.

आपली चावडी वेबसाईट ऑनलाईन माहिती

जमीन विक्री केल्यानंतर ७/१२ वरती नोंद करण्यापूर्वी खरेदी-विक्रीची माहिती हि आपली चावडी ई फेरफार (Aapli Chawdi) पोर्टल वरती प्रसिद्ध केली जाते. झालेल्या व्यवहारामध्ये जर कोणाला अडचण असेल तर ते “आपली चावडी” पोर्टल वरती माहिती प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसाच्या आतमध्ये आक्षेप घेऊ शकतात. शेतकऱ्याला जर आपली चावडी-Aapli Chawdi पोर्टल बद्दल माहिती असेल तर ते त्यावर आक्षेप घेऊ शकतो. यामुळे हा वाद जास्त वाढणार नाही.

आपली चावडी {Aapli Chawdi} पोर्टलवर माहिती कशी पहायची?

  • सर्वात आधी मोबाईल मध्ये आपली चावडी – Apli Chawadi Bhumi Abhilekh वेबसाईट ओपन करावी लागेल.
  • आपली चावडी पोर्टल – https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi हे ओपन करा.
  • साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे तीन पर्याय दिसतील.
    • सातबारा विषयी (७/१२)
    • मालमत्ता पत्रक विषयी (Property Card)
    • मोजणी विषयी (Mojni)
  • आपण ७/१२ संबंधित माहिती पाहणार आहोत म्हणून आपण सातबारा विषयी (७/१२) माहिती हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर आपला जिल्हा -तालुका-गाव निवडावे. खालील चौकानात कोड टाका व आपली चावडी पहा वर क्लिक करा.
  • तुमच्या गावातील जमिनी संदर्भातील चालू व्यवहार/चालू फेरफार याची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल.

Similar Posts

Leave a Reply