Ahilya Yojana 2022 : अहिल्या योजना सुरु झाली आहे, योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. अर्जदार वेबसाईट तसेच ॲप वरूनसुद्धा फॉर्म भरता येणार आहे.
Ahilya Yojana 2022 – अहिल्या योजना 2022
अहिल्या (Ahilya sheli Yojana) योजने अंतर्गत लाभार्थीला १० शेळ्या आणि १ बोकड असा गट वाटप करण्यात येणार आहे. याकरिता लाभार्थीला ९०% अनुदान देण्यात येणार आहे. हे रक्कम एकूण ६६ हजार रुपये असणार आहे. यामधून शासनाचे अनुदान ९०% म्हणजेच ५९ हजार ४०० रु. आणि लाभार्थ्याचा स्व-हिस्सा १०% आहे ६ हजार ६०० रु. असणार आहे.
अहिल्या योजना अर्ज
अर्जदार http://ahilyayojana.mahamesh.co.in/ या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच मोबाईल ॲपच्या (Ahilya Sheli Yojana/Ahilya Yojana) माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
अहिल्या योजेनेकरिता पात्रता
- अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी,अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती तसेच लाभार्थीचे वय वर्ष हे १८ पेक्षा कमी नसावे व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.“शेळी पालन ऑनलाईन फॉर्म”
हे पण वाचा : शेळी मेंढी पालन योजना सर्व प्रवर्गासाठी फॉर्म सुरु
- गेल्या तीन वर्षामध्ये ज्या व्यक्तीने किंवा कुटुंबातील सदस्याने पशु संवर्धन विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेतून लाभ घेतला असल्यास त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
- कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला अर्ज करता येईल.ahilyabai holkar goat farm
- अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती हे निमशासकीय/निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज संस्थेच्या सेवेत, शासकीय पदाचा लाभ घेणारा, सेवा निवृत्ती वेतन धारक, तसेच केंद्र शासन/स्थानिक स्वराज संस्थेचे सदस्य सदस्य/लोक प्रतिनिधी व पदाधिकारी नसावा.
योजनेबद्दल थोडक्यात माहिती.
योजनेचे नाव | अहिल्या शेळी योजना |
उद्दिष्ट | महाराष्ट्र राज्यात शेळी पालन व्यवसायाला प्राधान्य देणे. |
अर्ज सुरु दिनांक | १० डिसेंबर २०२२ |
अंतिम दिनांक | ०७ जानेवारी २०२३ |
देण्यात येणारा लाभ | १० शेळ्या १ बोकड गट (अनुदान) |
अर्ज कुठे करावा | येथे अर्ज करा |
जाहिरात | पहा |
Ahilya Sheli Yojana Documents
अहिल्या शेळी योजनेकरिता अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची संपूर्ण यादी पाहण्यासाठी योजनेची जाहिरात पहावी. जाहिरात पाहण्यासाठी वरील जाहिरात समोरील पहा वरती क्लिक करा.
At. Torali wada. Post Golyali pin 591345 .tal Khanapur dist belgaum