डिजिटल सहीचा 7/12 असा काढा मोबाईल वरून : Digital 7/12

Digital 712

Digital 7/12 : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, बरेच शेतकरी शेतीचा सातबारा उतारा/ 7/12, 8अ काढायचा असेल तर तलाठी कार्यालयात जाऊन काढतात. परंतु हा सातबारा मोबाईलवरूनसुद्धा शेतकरी काढू शकतात. यासाठी त्यांना तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही.

डिजिटल सहीचा 7/12 माहिती

शेती संबधित बरीचशी कागदपत्रे ऑनलाईन होत आहेत यामुळे शासकीय कार्यालयात जाण्याची गरज नाही. शेतीचा फेरफार ऑनलाईन काढणे, नकाशा ऑनलाईन बघणे, ऑनलाईन सातबारा बघणे, फेरफार नोंदविणे, इ. महत्वपूर्ण कामे शेतकरी मोबाईल वरून करू शकतात.

डिजिटल स्वाक्षरी सातबारा हा सर्व ठिकाणी कामांसाठी चालतो. त्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी यांची सही अथवा शिक्का घेण्याची गरज नाही. कर्ज घेणे, शासकीय योजना यासाठी डिजिटल स्वाक्षरी 7/12 चालतो.

डिजिटल स्वाक्षरी ७/१२ मोबाईल वरून कसा काढायचा?

शेतकरी मोबाईलवरून डिजिटल सातबारा काही मिनिटामध्ये काढू शकतात. सर्व प्रथम मोबाईलमध्ये डिजिटल 7/12 चे पोर्टल/साईट ओपन करावी लागेल. पोर्टलवरती लॉगइन करावे लागेल. त्यानंतर ७/१२ डाऊनलोड करण्यासाठी ऑप्शन येईल.

7/12 काढण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • सर्व प्रथम मोबाईल https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr हि साईट ओपन करावी.
  • त्यानंतर तुम्हाला लॉग -इन करण्यासाठी पर्याय आहे. त्याठिकाणी OTP Based Login हा पर्याय निवडा आणि मोबाईल नंबर टाका.
digital 7/12
digital 7/12
  • Send OTP या बटन वर क्लिक करा. मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल तो टाका आणि Verify OTP वरती क्लिक करा.
  • ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही लॉग-इन व्हाल.
Digital 7/12
  • 7/12 काढण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम रिचार्ज करावा लागेल. प्रती 7/12, १५ रु शुल्क आकारले जाते. आवश्यकतेनुसार रिचार्ज करा.
  • रिचार्ज झाल्यानंतर, वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे Digital signed 7/12 हा ऑप्शन निवडावा.
  • नंतर आपला जिल्हा-तालुका-गाव निवडा, आणि आपला गट नंबर टाकून Down+load या पर्याय वर क्लिक करावे.
  • पॉप अप मध्ये एक मेसेज येईल. सातबारा करिता १५ रु. कट होतील. OK करा. लगेच तुमचा सातबारा मोबाईल मध्ये डाऊन+लोड होईल.

Similar Posts

Leave a Reply