दुधाळ गाई/म्हशी वाटप योजना ऑनलाईन अर्ज सुरु; Dudhal Gai Mhashi Vatap Yojana

Dudhal Gai Mhashi Vatap Yojana

Dudhal Gai Mhashi Vatap Yojana : दोन दुधाळ गाई/म्हशी वाटप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. ज्या लाभार्थींना योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या लाभार्थींनी योजनेसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. आता अर्ज कुठे करायचा व त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात याबद्दल संपूर्ण माहिती आम्ही या लेखात दिलेली आहे.

या लेखामध्ये काय आहे.

दुधाळ गाई म्हशी वाटप योजना 2024

शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी, पशु संवर्धन विभाग महाराष्ट्र शासन (Department of Animal Husbandry, Government of Maharashtra) अंतर्गत विविध लाभार्थींना दोन दुधाळ गाई/म्हशीचे वाटप केले जाणार आहे. म्हणजेच लाभार्थींना दुधाळ/गाई म्हैस घेण्यासाठी शासनाकडून काही प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील नागरिक योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

नाविन्य पूर्ण योजनेअंतर्गत लाभार्थींना विविध योजनेचा लाभ मिळणार आहे. यामधील दोन दुधाळ गाई/म्हशी वाटप योजनेची माहिती या लेखात पाहणार आहोत. लाभार्थीला दोन दुधाळ गाई/म्हैस जनावराच्या गटासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

योजनेचे नावदोन दुधाळ गाई/म्हशीचे वाटप करणे
अर्ज सुरु दिनांक९ नोव्हेंबर २०२३
अर्ज करण्याची अंतिम मुदत८ डिसेंबर २०२३
अर्ज कुठे करायचाhttp://ah.mahabms.com/
“Gai Mhashi Vatap Yojana”

Navinya Purn Yojana 2024

दुधाळ गाई/म्हशीचे वाटप योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०% अनुदान मिळणार आहे. म्हणजेच लाभार्थीला ५०% रक्कम हिस्सा भरावा लागणार आहे. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ७५% अनुदान मिळणार आहे. म्हणजेच लाभार्थ्याला २५% रक्कम भरावी लागणार आहे.

लाभार्थी निकष, गाई म्हैस पालन योजना

  • अल्पभूधारक शेतकरी (१ हे. ते २ हे. पर्यंतचे भूधारक)
  • महिला बचत गट (अ.क्र. २ ते मधील)
  • सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? व गाई/म्हैस गटाची किंमत? व शासकीय अनुदान? इ. माहितीसाठी http://ah.mahabms.com/webui/yojana-details हि लिंक ओपन करावी. ओपन केल्यानंतर राज्यस्तरीय योजना-दुधाळ गाई/म्हशीचे वाटप करणे ऑप्शन वरती क्लिक करावे. तुम्हाला योजनेची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल.

महत्वाचे :-

राज्यस्तरीय योजना-दुधाळ गाई/म्हशीचे वाटप करणे (Dudhal Gai Mhashi Vatap) Yojana हि योजना या आर्थिक वर्षात मुंबई उपनगरे, मुंबई, तसेच दुग्धोत्पादनामध्ये सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर व सोलापूर ह्या जिल्ह्यांतर्गत राबविली जाणार नाही.

अर्जदाराने एकदा अर्ज भरल्यानंतर पुढील वर्षी नवीन अर्ज भरण्याची गरज नाही. कारण या योजनेसाठी एकदा अर्ज भरल्यानंतर पुढील ५ वर्षासाठी आपला अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. यामुळे पुढील वर्षी नवीन अर्ज भरावा लागणार नाही.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *