शेतकऱ्यांसाठी महसूल खात्याच्या ९ सेवा ऑनलाईन सुरु (e hakka pranali)
E hakka pranali : शेतकरी बांधवांसाठी नवीन अपडेट, शेतकरी मित्रहो तुम्हाला जर ७/१२ उतारावरील काही चूक दुरुस्त करावयाची असल्यास तुम्हाला तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही, आपण घरबसल्या चूक दुरुस्ती करिता ऑनलाईन अर्ज करू शकता.
तसेच या व्यतिरिक्त आणखी ८ सेवांचा सुद्धा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. महसूल खात्याने इ हक्क प्रणाली e mutation maharashtra सुरु केली आहे. यामध्ये शेतीच्या ९ सेवांचा समावेश आहे.
इ हक्क प्रणाली मध्ये शेतकऱ्यांना कोणत्या सुविधा मिळणार? | e hakka pranali
शेतकऱ्यांना https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin या प्रणालीवर १) ७/१२ वरील चूक दुरुस्ती, २) मृताचे नाव कमी करणे, ३) वारस नोंद करणे, ४) बोजा कमी करणे, ५) एकत्र कुटुंब नोंद कमी करणे, ६) अपाक शेरा कमी करणे, ७) इ करार नोंद, ८) विश्वस्ताचे नाव कमी करणे. ९) बोजा चढविणे/गहाणखत इ. सेवा इ हक्क प्रणाली मध्ये मिळणार आहेत.
इ हक्क प्रणाली म्हणजे काय? | E Mutation Maharashtra
इ हक्क प्रणाली मध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या नोंदी, चूक दुरुस्ती, करार इ. ७/१२ संबंधित सेवा सुविधांचा लाभ मिळणार आहे. इ हक्क प्रणाली हि ऑनलाईन प्रणाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना तलाठी कार्यलयात जाण्याची आवश्यकता नाही.