Kusum Solar Yojana; असा भरा सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज

Mahaurja Kusum Solar Yojana

Kusum Solar Yojana Maharashtra : प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेसाठी १७ मे २०२३ पासून ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून. शेतकऱ्यांना https://www.mahaurja.com/meda या अधिकृत साईटवरती ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

या लेखामध्ये काय आहे.

Kusum Solar Yojana Maharashtra

ऑनलाईन अर्ज सुरु झाल्यानंतर साईटवरती अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. तसेच मर्यादित कोटा उपलब्ध असल्यामुळे अर्ज भरण्यासाठी (Mahaurja solar application) शेतकऱ्यांची ऑनलाईन सुविधा केंद्रावर गर्दी होत आहे. तसेच नवीन कोटा उपलब्ध झाल्यानंतर काही कालावधीतच कोटा पूर्ण होत आहे.

योजनेचे नावपीएम कुसुम सोलर पंप योजना (Kusum Kusum Solar Pump Yojana)
अर्ज सुरु दिनांक१७/०५/२०२३
कोटा शिल्लक आहे का हे पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
Kusum Solar Yojana maharashtra 2024

अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाने https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B हि लिंक उपलब्ध करून दिली आहे. सर्व प्रथम या लिंक वरून नोंदणी (Kusum Solar Registration) करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड आणि आपला मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.

नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला 15 रु ऑनलाईन शुल्क भरावे लागणार आहे. शेतकरी मोबाईल वरून किंवा जवळच्या ऑनलाईन (mahaurja solar pump apply online) सुविधा केंद्रावर किंवा आपले सरकार सेवा केंद्र याठिकाणी जावून आपला अर्ज भरू शकतात.

  • टीप : अर्ज भरताना सर्व माहिती हि बरोबर भरावी. एकदा भरलेली माहिती अर्ज Submit/सबमिट केल्यानंतर पुन्हा दुरुस्त करता येणार नाही.

Kusum Solar Pump Registration Maharashtra

मोबाईलवरून अर्ज कसा करायचा

भाग नंबर – १

  • अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांना (kusum.mahaurja.com login) वरील साईटवर नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणीसाठी खालीलप्रमाणे माहिती दिसेल, त्याठिकाणी तुम्हाला एक Safe Village List हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून आपल्या गावाचे नाव यादीत आहे का हे पाहावे.
  • यादीमध्ये नाव असेल तर आपण Diesel Pump User या पर्यायामध्ये No हा पर्याय निवडू शकता.
  • परंतु यादीमध्ये नाव नसेल तर त्याठिकाणी Yes पर्याय निवडून अर्ज करू शकता.
  • आधार नंबर, जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल नंबर आणि Caste Category मध्ये जात प्रवर्ग निवडून Payment For online Application या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर १५ रु शुल्क भरावे लागेल.
pm kusum solar yojana
kusum solar yojana
  • शुल्क भरताना shipping माहिती भरावी त्यानंतर “mahaurja registration” आपण कशाद्वारे शुल्क भरणार तो ऑप्शन निवडून शुल्क भरा.
  • शुल्क भरल्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर वरील पेज उघडेल.
  • पुन्हा सुरुवातीला भरलेली माहिती पुन्हा भरा. आणि Payment For online Application बटणवर क्लिक करा.
  • परंतु तेथे तुम्हाला पुन्हा शुल्क भरायचे नाही.
    • टीप : एकदा शुल्क भरल्यानंतर पुन्हा शुल्क भरण्याची गरज नाही.
  • आपल्या जिल्ह्यात किती कोटा उपलब्ध आहे याची माहिती दिसेल.
  • Proceed वर क्लिक करा त्यानंतर नवीन पेज उघडेल त्याठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून शेतीचा गट नंबर टाकायचा आहे.
  • नंतर व त्यामधून आपले नाव निवडायचे आहे. इतर माहिती भरून Submit Application वर क्लिक करा.
  • त्यानंतर मोबाईल नंबरवर एक सहा अंकी ओटीपी (OTP) येईल तो टाकावा.
  • मोबाईल नंबर वरती एक मेसेज येईल त्यामध्ये तुम्हाला युजरनेम व पासवर्ड मिळेल. तो लिहून ठेवावा.

Mahaurja Beneficiary Login Registration

भाग नंबर – २

  • युजरनेम आणि पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्हाला https://kusum.mahaurja.com/beneficiary/ या साईट वरती ते युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग-इन करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला ८ स्टेपमध्ये माहिती भरायची आहे. त्यामधील पहिल्या दोन स्टेप/ऑप्शन मध्ये कोणताही बदल करता येणार नाही. त्यानंतरच्या स्टेप मधील माहिती भरायची आहे.
    1. नवीन किंवा बदली डीझेल पंपाची विनंती
    2. अर्जदाराची वैयक्तिक व जमीन विषयक माहिती
    3. अर्जदाराचा निवासी पत्ताsolar pump registration online
    4. जलस्त्रोत आणि सिंचन माहिती
    5. पिकांची माहिती
    6. आवश्यक पंपाची माहिती
    7. बँकेची माहिती
    8. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर अटी व शर्ती या चौकोनात टिकमार्क करा. यानंतर Submit वरती क्लिक करा. आपला अर्ज यशस्वीरीत्या सबमिट होईल.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *