नवीन विहिरीसाठी 4 लाख रु. अनुदान मिळणार; Navin vihir yojana
Navin vihir yojana 2024 – नवीन विहिर अनुदान योजना : शेतामध्ये जर नवीन विहीर बांधायची असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती. कारण नवीन विहीर बांधणीच्या नियमामध्ये आणि अनुदानामध्ये शासनाने बदल केला आहेत. यामुळे शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
Navin vihir yojana 2024
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहीर तसेच इतर विविध योजना राबविल्या जातात. नवीन सिंचन विहिरीच्या नियम, अटी, पात्रता, लाभ धारकाची निवड, अनुदान याबाबत नवीन शासन निर्णय दि. ०४/११/२०२२ रोजी शासनाने निर्गमित केला आहे.“मागेल त्याला विहीर योजना”
शेतामध्ये नवीन विहीर vihir yojana online application बांधायची असेल तर त्यासाठी खर्च हा खूप येतो. परंतु शासनाकडून जर विहिरीसाठी अनुदान मिळाले तर याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि यामुळे कर्ज (loan) सुद्धा घ्यावे लागणार नाही.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विहिरीच्या किमतीत कमाल मर्यादा ३ लाखावरून ४ लाख करण्यात आली आहे.
- दोन विहिरी (well) मधील अंतर ५०० मीटरहून १५० मीटर करण्यात आले आहे. (अटी लागू-शासन निर्णय पहा)
सिंचन विहिरी संदर्भात पुढील प्रमाणे नवीन सूचना आहेत.
लाभधारकाची निवड :
अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, अटी व शर्ती, अर्ज, लाभ धारकाची पात्रता संपूर्ण सविस्तर माहितीसाठी शासन निर्णय पहा.