Online Satbara; ऑनलाईन सातबारा बघा मोबाईलवर मोफत नवीन वेबसाईट सुरु
Online Satbara Maharashtra : शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आता, शेतकऱ्यांना शेती संबधित सर्व कागदपत्रे एकाच वेबसाईट वरती मिळणार आहे. शासनाने नवीन वेबसाईट सुरु केली आहे, यालेखात आपण शेतीचा सातबारा “712 digital” नवीन साईटवरती मोबाईल वरून कसा पहायचा याबद्द्द्ल सविस्तर माहिती दिलेली आहे.
Online Satbara Utara Maharashtra
शेतकऱ्यांनी सातबारा उतारा मोबाईल वरून कसा पहायचा याबद्द्द्ल संपूर्ण माहिती याठिकाणी दिलेली आहे. शेतकऱ्यांना https://bhulekh.mahabhumi.gov.in/ सातबारा उतारा या वेबसाईट वरून पाहता येतो तसेच आता महाराष्ट्र शासनाने https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ हि नवीन वेबसाईट सुरु केली आहे. या वेबसाईट वरून नागरिक शेतीचा ७/१२ उतारा, ८ अ, फेरफार, नकाशे, प्रॉपर्टी कार्ड/मालमत्ता पत्रक, मालमत्ता पत्रकाचे फेरफार, डिजिटल सहीचे उतारे, फेरफार इतर कागदपत्रे काढू शकतात/पाहू शकतात. यामुळे “ऑनलाईन सातबारा बघणे” सोपे झाले आहे.
Bhumi Abhilekh-Online Satbara
भूमी अभिलेख मुख्य वेबसाईट | येथे क्लिक करा |
७/१२ वेबसाईट | येथे क्लिक करा |
सातबारा ऑनलाईन (Online Satbara) कसा पहायचा
नवीन वेबसाईट “Online Satbara” वरती सातबारा पाहण्यासाठी सर्व प्रथम https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ हि वेबसाईट मोबाईल मध्ये क्रोमअँप मध्ये ओपन करा. त्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे विविध ऑप्शन दिसतील,
- ७/१२ उतारा
- ८ अ उतारा
- फेरफार प्रत
- मालमत्ता पत्रक
- ७/१२ फेरफारसाठी अर्ज ई-हक्क
- मिळकत पत्रीका फेरफार अर्ज
- फेरफार स्थिती
- अधिकार क्षेत्र जाणून घ्या
- प्रलंबित दिवाणी न्यायालयीन प्रकरणे
असे विविध पर्याय पाहायला मिळतील. आपल्याला इ. सुविधा माहिती ऑनलाईन मिळणार आहे. यासाठी कोणत्याहि शासकीय कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या कोणत्याहि गावातील जमिनीचे सातबारा उतारे आपण मोबाईल वरती पाहू शकता.
सातबारा उतारा {Online Satbara} पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा
मोबाईल मध्ये https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ साईट ओपन करा त्यानंतरवरील प्रमाणे तुम्हाला पर्याय दिसतील, त्यामध्ये ७/१२ उतारा डाऊनलोड या ऑप्शन वरती क्लिक करा.(Online Satbara)
- त्यानंतर तुम्हाला ७/१२ ची मुलभूत माहिती भरायची आहे. म्हणजेच विभाग, जिल्हा, तालुका, गाव निवडायचे आहे.
- गट नंबर/सर्व्हे नंबर, नाव, मधले नाव, आडनाव इ. ऑप्शनद्वारे आपण सातबारा पाहू शकता.
- गट नंबर टाकून उप सर्व्हे नंबर मधून आपला गट नंबर पुन्हा निवडा.
- खालील चौकोनात मोबाईल नंबर टाकून ७/१२ उतारा पहा या पर्याय वरती क्लिक करा. तुम्हाला जमिनीचा सातबारा पाहायला मिळेल.