कुसुम सोलर पंप योजना कोटा शिल्लक आहे का? पहा
Pradhan Mantri Kusum Solar Yojana : आपल्या जिल्हात कोटा शिल्लक आहे का? हे कसे चेक करणार याची सविस्तर माहिती याठिकाणी दिली आहे.
कोटा शिल्लक आहे का कसे पाहणार?
- प्रथम MAHA URJA पोर्टल ला भेट द्या. पोर्टल – https://www.mahaurja.com/meda/
- खाली दाखवल्या प्रमाणे वेबसाईट वरती महाकृषि अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी वरती क्लिक करा.
- आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये योजनेबद्दल सद्यस्थिती माहिती दिली जाईल. माहिती वाचून Close वरती क्लिक करा.
- खालील दाखवल्या प्रमाणे तुम्हाला माहिती भरावी लागेल.
- परंतु तुम्हाला याठिकाणी Registratation करायचे नाही.
- Safe Village List पर्यायावर क्लिक करा. तुमच्यासमोर एक P D F ओपन होईल त्यामध्ये तुमच्या गावाचे नाव नसेल तर Is Existing Diesel Pump User मध्ये YES पर्याय निवडा.
- लिस्ट मध्ये तुमच्या गावचे नाव असेल तर आपण YES किंवा NO पर्याय निवडू शकता.
- यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका.
- Maharashtra राज्य हे आपण बदलू शकत नाही.
- ज्याठिकाणी आपली शेतजमीन आहे. त्याठीकाणचा पत्ता – जिल्हा – तालुका – गाव निवडा.
- मोबाईल नंबर टाका नंतर आपला जात प्रवर्ग निवडा. (SC/ST, General)
- Payment For Online Application पर्यायावर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाल पेमेंट करायचे नाही. क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यात शिल्लक असलेला कोटा पाहायला मिळेल.
- जिल्ह्यात कोटा शिल्लक असेल तर खालील प्रमाणे माहिती दिसेल.
पुणे जिल्ह्यात SC प्रवर्गासाठी उपलब्ध कोटा.
दि. – २७/१०/२०२२, वेळ. – ११: ४६ AM
पुणे जिल्ह्यात ST प्रवर्गासाठी उपलब्ध कोटा.
दि. – २७/१०/२०२२, वेळ. – ११: ४६ AM