रोटाव्हेटर अनुदान योजनेसाठी अर्ज सुरु ; Rotavator Anudan Yojana Maharashtra
Rotavator Subsidy Yojana : शेतकऱ्यांसाठी विविध योजना सरकार/शासन राबवीत असते. शेती संबधित औजारे, यंत्र, बियाणे, खते इ. साठी शासनाकडून अनुदान दिले. तसेच ऑनलाईन अर्ज असल्यामुळे कुठेही जाण्याची गरज भासत नाही. रोटाव्हेटरसाठी अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
Rotavator Subsidy Yojana Maharashtra
शेतकऱ्यांना रोटाव्हेटर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. शेतकरी मोबाईल वरून अर्ज करू शकतात किंवा जवळील ऑनलाईन सेवा केंद्र याठिकाणी जावूनसुद्धा अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- आधारकार्ड झेरॉक्स
- ७/१२, ८अ
- आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते पासबुक झेरॉक्स
- अनु. जाती, अनु. जमाती प्रवर्गातील शेतकरी असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक
- Tractor RC (निवड झाल्यानंतर आवश्यक)
- मोबाईल क्रमांक
रोटाव्हेटर अनुदान योजना माहिती
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजने अंतर्गत रोटाव्हेटर घटकासाठी अनुदान दिले जाते. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
योजनेचे नाव | कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजना |
मिळणारा लाभ | रोटाव्हेटर साठी अनुदान |
अर्ज कुठे करावा | MahaDBT Farmer Portal |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
लाभार्थी वर्ग | शेतकरी |
योजनेमधून रोटाव्हेटरसाठी अनुदान किती मिळणार?
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी/महिला शेतकरी इ. असल्यास ५०% खालीलप्रमाणे अनुदान मिळेल.
रोटाव्हेटर ५ फुट | ४२००० रु पर्यंत |
रोटाव्हेटर ६ फुट | ४४८०० रु पर्यंत |
रोटाव्हेटर ७ फुट | ४७६०० रु पर्यंत |
रोटाव्हेटर ८ फुट | ५०४०० रु पर्यंत |
इतर लाभार्थ्यांसाठी ४०% खालील प्रमाणे अनुदान मिळेल.
रोटाव्हेटर ५ फुट | ३४००० रु पर्यंत |
रोटाव्हेटर ६ फुट | ३५८०० रु पर्यंत |
रोटाव्हेटर ७ फुट | ३८१०० रु पर्यंत |
रोटाव्हेटर ८ फुट | ४०३०० रु पर्यंत |
कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजना
- शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेमधून रोटाव्हेटर तसेच पेरणी यंत्र, नांगर शेती संबधित सर्व औजारे व यंत्र यासाठी अनुदान मिळते.
- महाडीबीटी पोर्टल वरती एकदा नोंदणी केल्यानंतर विविध शेतकरी अर्जासाठी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे.
- ऑनलाईन अर्ज केल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा सदर योजनेसाठी अर्ज करावा लागणार नाही.
- एकाच अर्जामध्ये अनेक योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
- कृषी यांत्रिकीकरण योजनेमधून यंत्र, यंत्रचलित औजारे, बैलचलित औजारे इतर अनेक घटकासाठी अनुदान मिळते.