शारदा शेतकरी – माता भगिनी अर्थसहाय्य योजना (Sharda Shetkari Mata Bhagini Yojana)

शारदा शेतकरी माता भगिनी योजना

Sharda Shetkari Mata Bhagini Yojana : जिल्हा परिषदेकडून शेतकरी महिलांना अर्थसाह्य देण्यात येत आहे. हे अर्थ सहाय्य डीबीटी (Direct Benifit Transfer) पद्धतीने दिले जाईल. यासाठी अटी व शर्ती,अर्ज,पात्रता काय आहे. याची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

ही योजना १०० टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे, तसेच जिल्हा परिषद पुणे सन २०२२-२०२३ जिल्हा परिषद निधी अंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे.

शारदा शेतकरी माता भगिनी योजना | Sharda Shetkari Mata Bhagini Yojana

पात्रता.

  • “शारदा” शेतकरी माता भगिनी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत खालील शेतकरी महिला लाभ घेण्यास पात्र राहतील.
    • निराधार शेतकरी महिला, घटस्फोटीत शेतकरी महिला, ग्रामीण भागातील विधवा शेतकरी महिला,परीतक्त्या शेतकरी महिला इ. महिला “शारदा” शेतकरी- माता भगिनी योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
  • शारदा शेतकरी माता भगिनी योजनेचा शेतकरी महिलांना नक्कीच फायदा होणार आहे.
  • शेतकरी महिलांना शेतीच्या पीक पेरणी, बियाणे, मशागत करणे, खते, कीटकनाशके इत्यादी खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत?

  • वरीलप्रमाणे (पात्रता वाचा) तसेच
  • सर्व प्रवर्गातील निराधार,घटस्फोटीत,ग्रामीण भागातील विधवा,परीतक्त्या शेतकरी महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • वयाची अट – १८ ते ६५
  • दिलेल्या आर्थिक सहाय्याचा शेतीच्या कामासाठी वापर करावा.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?

  • आधार कार्ड,बँक पासबुक, ७/१२, ८अ उतारा.(Self Attested)
  • शौचालय वापर करीत असलेबाबतचे स्वयं घोषणापत्र.
  • Sharda Shetkari Mata Bhagini Yojana
योजनेचे नाव“शारदा” शेतकरी-माता भगिनी अर्थसहाय्य योजना
जिल्हा परिषदपुणे
अर्ज करण्याचा कालावधी२२ ऑगस्ट २०२२ पर्यंत
अर्जाचा नमुनापहा
पुणे जिल्हा परिषदेचे संकेतस्थळयेथे पहा
अधिक माहितीपहा
Zilla Parishad Yojana Pune

अतिमहत्वाचे : लाभार्थीने खोटी माहिती किंवा खोटी कागदपत्रे दिलेली आढळल्यास मिळालेला लाभ पुन्हा करावा लागेल.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत.