शेळी, मेंढी गट वाटप योजना ऑनलाईन फॉर्म सुरु : Sheli Mendhi Gat Vatap Yojana

Sheli Mendhi Gat Vatap Yojana

Sheli Mendhi Gat Vatap Yojana : राज्यस्तरीय शेळी/मेंढी गट वाटप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज/फॉर्म सुरु झाले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा व योजनेबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

या लेखामध्ये काय आहे.

Sheli Mendhi Gat Vatap Yojana

महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाकडून नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय शेळी/मेंढी गट वाटप करणे, योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. सदर योजनेतून पात्र लाभार्थीला अंशतः ठाण बद्ध पद्धतीने संगोपन करण्यासाठी १० शेळ्या/मेंढ्या व १ बोकड/नर मेंढा गटाकरिता अनुदान दिले जाणार आहे.

अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील लाभार्थीला योजनेतून ७५% अनुदान मिळणार आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीला ५०% अनुदान मिळणार आहे. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शासनाने https://ah.mahabms.com/ या पोर्टलवरती सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

तसेच ज्या लाभार्थींनी मागील वर्षी अर्ज भरलेले आहे, त्यांना पुन्हा योजनेसाठी अर्ज करण्याची गरज नाही, Sheli Mendhi Gat Vatap Yojana अर्जदाराने योजनेसाठी एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. तोच अर्ज ५ वर्षासाठी ग्राह्य धरला जाईल.

Sheli Mendhi Palan Online Application

शेळी मेंढी पालन योजना 2025, योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत, तसेच ज्या अर्जदारांनी मागील वर्षी अर्ज भरले आहेत, त्यांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर अर्जदाराला एसएमएस द्वारे कळविले जात आहेत.

ज्या अर्जदारांनी सन २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थींना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ०८/०६/२०२५ पासून साईट वरती कागदपत्रे अपलोड पर्याय दिला जाणार आहे. अर्जदाराने विहित कालावधी मध्ये कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करणे गरजेचे आहे. २०२५-२६ या वर्षी नवीन अर्ज केलेल्या लाभार्थींना सुद्धा वेळापत्रकानुसार कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.

योजनेचे नावनाविन्यपूर्ण योजना 2025
योजनाराज्यस्तरीय योजना-शेळी/मेंढी गट वाटप योजना
मिळणारा लाभशेळी/मेंढी गटासाठी अनुदान
विभागपशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन
अर्ज सुरु दिनांक03/05/2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख02/06/2025
अर्ज कुठे करायचाhttps://ah.mahabms.com/
navinya purna yojana 2025

ah.mahabms.com online application 2025

ऑनलाईन अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरणे गरजेचे आहे. अर्ज भरताना कोणती माहिती चुकीची असल्यास लाभार्थीला अर्जामध्ये बदल करण्यासाठी गुगल फॉर्म उपलब्ध करून दिला आहे. योजनेसाठी अर्ज करा या पेज वरती लॉग इन करा या बटनच्या खाली केलेल्या अर्जामध्ये बदल करा हा ऑप्शन दिलेला आहे. अर्जामध्ये काही बदल करायचा असल्यास लाभार्थीने हा फॉर्म भरून द्यावा.

राज्यस्तरीय शेळी/मेंढी गट वाटप योजनेसाठी अर्जदार मोबाईल संकेस्थळावरून किंवा मोबाईल अँप्लिकेशन वरून योजनेसाठी अर्ज करू शकतात. किंवा जवळील ऑनलाईन सुविधा केंद्रावर जावून अर्ज करू शकतात.

Similar Posts

Leave a Reply