सोलर पंप योजनेचे पैसे परत मिळणार : Mahadbt Solar Pump Scheme

Mahadbt Solar Pump Scheme : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, ज्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळाला आहे. अशा शेतकऱ्यांना भरलेले पैसे परत मिळणार आहे.

शेतकऱ्यांना कोणत्या योजने अंतर्गत पैसे परत मिळणार, कोणाला मिळणार, कोणते शेतकरी पात्र असणार, कोणाकडून पैसे परत मिळणार याची संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे.

Mahadbt Solar Pump Scheme

योजनेबद्दल माहिती?

शेतकऱ्यांना (Mahadbt Solar Pump Scheme) प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप (Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana) योजने अंतर्गत ३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी या क्षमतेचा सोलर पंप (SC & ST= ९५%) (General = ९०%) अनुदानावर दिला जातो.

शेतकऱ्यांना ५% ते १०% लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. तसेच या यामुळे सौर पंप घेण्याकरिता शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे. सोलर पंप घेण्सासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो.

फक्त याच शेतकऱ्यांना पैसे परत मिळणार?

फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी या लाभास पात्र आहेत. SC & ST प्रवर्गातील शेतकऱ्यांनी कृषी सोलर पंप योजनेचा चालू वर्षी लाभ घेतला आहे. त्यांनी लाभार्थी हिश्याची ५%/१०% रक्कम भरलेली आहे ती रक्कम (पं.स) कृषी खात्याकडून मिळण्यासाठी ऑनलाईन Maha DBT पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे.

माहितीसंकेतस्थळ
Mahaurja Kusum Registrationhttps://www.mahaurja.com/
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojanahttps://www.mahadiscom.in/
solar pump scheme

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • अर्ज करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login भेट द्या.
    • आपण जवळील ऑनलाईन केंद्रावर जाऊन सुद्धा फॉर्म भरू शकता.
  • आपल्या समोर नवीन पेज ओपन होईल.
  • खालच्या बाजूला नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून नोंदणी करून घ्यावी.
  • Maha DBT पोर्टल काय आहे पहा.
  • नोंदणी केल्यानंतर लॉग ईन करावे.
  • खालील दाखवल्याप्रमाणे अर्ज करा वर क्लिक करा.

  • कृषी यांत्रिकीकरण
  • सिंचन साधने व सुविधा
  • बियाणे औषधे व खते
  • फलोत्पादन
  • अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना समोरील बाबी निवडा वरती क्लिक करा.
  • खालील दाखवल्याप्रमाणे आपले क्षेत्र आणि निवडा.

  • जतन करा आणि अर्जाचे शुल्क भरा. शुल्क भरल्यानंतर आपल्याला अर्जाची पोहोच पावती मिळेल.Mahadbt Solar Pump Scheme
  • आपली निवड झाल्यानंतर आपण दिलेल्या मोबाईल नंबर वरती मेसेज येईल.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी, उदा. सौर कृषी पंपाचे भरलेले पैसे याची पावती, आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२, ८ अ उतारा, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला. इ.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *