Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana : महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि प्रधानमंत्री कुसुम सोलर योजान या दोन योजना शेतकऱ्यांसाठी राबविल्या जातात. शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत ३एच पी, ५ एचपी आणि ७.५ एच पी चे सौर पंप ९०% ते ९५% अनुदानावर दिले जातात.
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी योजनेची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. योजनेचे पात्रता निवडीचे निकष काय आहेत. अर्ज कुठे करावा लागेल, कागदपत्रे कोणती लागतील याची संपूर्ण माहिती याठिकाणी आपण पहाणार आहोत.
शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी ९०% अनुदान दिले जाते आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ९५% अनुदान दिले जाते. यामुळे सर्वसाधारण (General) प्रवर्गातील शेतकऱ्यांना फक्त १०% स्वहिस्सा भरावा लागणार आहे. आणि अनुसूचित जाती (SC)/अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५% स्वहिस्सा भरावा लागेल.
Maharashtra Solar Pump Yojana Online Application
- शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/ या संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल.
- प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या साईट वरती अर्ज करता येईल.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्जाचे स्टेटस आपण वरील साईट वरती चेक करू शकता.
Solar Pump लाभार्थी निवडीचे निकष.
- शेतकऱ्याकडे असलेल्या शेत जमिनीवर खात्रीशीर पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणे गरजेचे आहे.(farmer solar power scheme)
- ज्या शेतकऱ्यांनी (कृषी पंप) नवीन वीज जोडणीकरीता अर्ज केलेला आहे, असे पेड प्रलंबित ग्राहक.
- पारंपारिक वीज जोडणी शेतकऱ्यांकडे नसावी.
- धडक सिंचन योजनेचे लाभार्थी शेतकरी
- असे शेतकरी ज्यांचे यापूर्वी कोणत्याही योजनेअंतर्गत विद्युतीकरण/electrification झाले नाही. तसेच अशा गावातील शेतकरी ज्यांचे वन विभागाच्या NOC मुळे अद्याप विद्युतीकरण/electrification झाले नाही.
वरील निकष हे ३ एचपी व ५ एचपी सौर पंपाकरिता आहे. ७.५ एचपी पंपाकरिता लाभार्थी निवडीचे निकष यामध्ये बदल आहे.
प्राधान्य
दुर्गम भागातील व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत प्राधान्य देण्यात येईल.
शेतकऱ्यांना किती HP/एचपी क्षमतेचा पंप मिळणार
- शेतजमिनीचे क्षेत्र जर ५ एकर पर्यंत असेल तर शेतकऱ्यांना ३ एचपी क्षमतेचा पंप दिला जाईल. solar pump yojana
- ५ एकर पेक्षा जास्त शेतजमीन क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ एचपी किंवा ७.५ एच क्षमतेचा पंप दिला जाईल.
अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे शेतकऱ्याकडे असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड, बँक पासबुक
- शेतकरी SC/ST प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- 7/12, 8अ mukhyamantri solar pump yojana maharashtra
- शेजारील कृषी पंपाचे वीज बिल (ग्राहक क्रमांक फॉर्म भरताना टाकण्यासाठी)
- मोबाईल नंबर
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी नवीन अर्ज सुरु नाहीत, परंतु शेतकरी कुसुम सोलर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकतात, कुसुम सोलर योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरु आहेत