जत्रा शासकीय योजनांची : प्रत्येक जिल्ह्यात ७५ हजार लाभार्थींना मिळणार लाभ

Jatra Shaskiya Yojananchi

Jatra Shaskiya Yojananchi – Sarv Samanyachya Vikasachi : जत्रा शासकीय योजनांची – सर्व सामान्यांच्या विकासाची या अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ७५००० लाभार्थींना विविध योजनांचा Jatra Shaskiya Yojananchi लाभ दिला जाणार आहे.

Jatra Shaskiya Yojananchi – Sarv Samanyachya Vikasachi

शासन नागरिकांसाठी विविध योजना राबविते, या योजनांची अंमलबजावनिकारिता दर वर्षीच्या अर्थ संकल्पामध्ये आर्थिक तरतूद केली जाते. सदर योजनांची शासनाकडून विविध स्तरावर प्रचार प्रसिद्ध केली जाते. परंतु नागरिकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये जावे लागते.

त्याठिकाणी जावून योजनेची माहिती घेणे, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करणे/जुळविणे. तसेच सर्व कागदपत्रे कार्यालयामध्ये जमा करणे, त्यामध्ये काही त्रुटी असल्यास ती दूर करणे. यामध्ये वारंवार नागरिकांना कार्यालयामध्ये जावे लागत असे. यामध्ये गरजू व्यक्तींनासुद्धा लाभ घेण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे योजनेचा उद्देश पूर्णपणे सफल होत नाही.

Shemes of Maharashtra Government

महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधीकडून यापूर्वी जामनेर, चाळीसगाव, मुरबाड, कल्याण इ. ठिकाणी हे जत्र शासकीय योजनांची-सर्व सामन्यांच्या विकासाची हे अभियान राबविले होते. या उपक्रमामध्ये कमीतकमी कालावधीमध्ये नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात आला आहे.

अभियानाचे नावजत्रा शासकीय योजनांची – सर्व सामन्यांच्या विकासाची
विस्तारमहाराष्ट्र राज्य
वर्ष2023
मिळणारा लाभशासनाच्या विविध योजनाचा लाभ
शासन निर्णयपहा
Shaskiya Yojana Maharashtra

शासकीय योजनांची जत्रा शासन निर्णय

  • राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये हे अभियान/उपक्रम १५ एप्रिल २०२३ ते १५ मे २०२३ या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या अभियानचे जिल्हाधिकारी हे जिल्हा प्रमुख असतील.इतर सर्व विभाग त्यांच्या समन्वयाने काम करतील. १५ एप्रिल २०२३ ते १५ या कालावधीमध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देणे, प्रस्तावित लाभार्थ्याची यादी तयार करून लाभार्थीकडून अर्ज भरून घेणे अपेक्षित आहे.

या शासन निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.

Similar Posts

Leave a Reply