MahaDBT Farmer; मागेल त्याला मिळेल योजनेचा लाभ पहा

MahaDBT Farmer scheme.

MahaDBT Farmer Scheme 2024 : मागेल त्या शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळणार आहे. “MahaDBT Farmer” योजनेचा लाभ कसा मिळणार? अर्ज कुठे करावा लागणार? त्यानंतर पुढे काय प्रोसेस करावी याबद्दल संपूर्ण माहिती येथे पाहणार आहोत.

MahaDBT Farmer Scheme 2024

महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती उपयोगी यंत्र तसेच औजारे नवीन विहीर बांधकाम, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग, तसेच कांदाचाळ, शेततळे, फळबाग लागवड, सिंचन साधने व सुविधा, शेततळ्याचे अस्तरीकरण इ. अनेक घटकासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज घेतले जातात.

पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेसाठी वेगळा अर्ज भरण्याची गरज पडत नाही. एकाच अर्जाद्वारे अनेक योजनासाठी शेतकरी अर्ज करू शकतात. तसेच पोर्टल वरती अर्ज केल्यामुळे शेतकऱ्यांना मागेल त्या योजनेचा लाभ मिळणे शक्य झाले आहे.

MahaDBT Farmer Registration Online

शेतकऱ्यांना https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या साईट वरती नोंदणी करून अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना वैयक्तिक माहिती, तसेच शेतीची माहिती इ. माहिती भरावी लागेल. यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड, बँक खातेपुस्तक, जातीचा दाखला (SC/ST), शेतीचा ७/१२ उतारा इ. कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

जवळील आपले सरकार सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र इ. ठिकाणी जावून शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात. किंवा मोबाईल वरूनसुद्धा वरील साईटच्या माध्यमातून अर्ज करू शकतात.

मागेल त्याला मिळेल योजनेचा लाभ (Magel Tyala Yojana)

शेतकऱ्यांना खालील मागेल त्या घटकासाठी २५ एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार लाभ दिला जाणार आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करावा लागणार आहे.(mahadbt farmer scheme)

१) मागेल त्याला शेडनेट/हरितगृह
२)मागेल त्याला शेततळे
३)मागेल त्याला तुषार/ठिबक सिंचन
४)मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र आणि कॉटन श्रेडर
५)मागेल त्याला फळबाग
६)मागेल त्याला शेततळ्याचे अस्तरीकरण
mahadbt farmer scheme list

Similar Posts

Leave a Reply